शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्पच्या धमक्यांना इंडियन ऑईल घाबरली, रशियाकडून तेल खरेदी केली बंद; रिलायन्स मात्र...
2
Anil Ambani ED: अनिल अंबानींना ED नं चौकशीसाठी बोलावलं, १७ हजार कोटींच्या लोन फ्रॉड केसमध्ये टाकलेले छापे
3
एकमेकांना शेवटचं बघताच आलं नाही! अल्जेरियात मुलाचा मृत्यू, मृतदेहाची वाट पाहणाऱ्या वडिलांचेही निधन 
4
माजी आमदाराची मुलगी अन् पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीचा रहस्यमय अंत; मृत्यूपूर्वीचा Video आला, मग...
5
Stock Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; Sensex १७० अंकांची घसरण, FMCG Stocks मध्ये मोठी खरेदी
6
ऑनलाईन गेममध्ये पैसे जिंकले, पार्टीसाठी बाहेर पडले अन्...; ५ तरुणांसोबत घडलं आक्रित
7
"तिने आमचं घर तोडलं असं लोक म्हणाले, पण...", RJ महावशसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलला युजवेंद्र चहल
8
Yuzvendra Chahal : "आयुष्याला कंटाळलो, २ तास रडायचो, आत्महत्येचे विचार..."; युजवेंद्र चहलने घटस्फोटावर सोडलं मौन
9
धुळ्याची लेक मृणाल ठाकूरचा पहिलाच मराठी सिनेमा, 'या' अभिनेत्यासोबत केलेला रोमान्स
10
पती पत्नीसाठी बेस्ट आहे Post Office ची 'ही' स्कीम; ५ वर्षांत जमवू शकता १३ लाख रुपये, जाणून घ्या
11
नवऱ्याला सोडून पुतण्यासोबत लग्न, आता पुन्हा गावात येऊन पहिल्या पतीला दिलं थेट आव्हान! म्हणाली...
12
भारताविरोधात एवढी कारस्थाने रचून ट्रम्पना अजूनही आशा; सही केली पण टेरिफ ७ दिवस टाळले
13
खुर्चीवरुन कोसळला अन्...; ३० वर्षीय डिलिव्हरी बॉयचा हार्ट अटॅकने मृत्यू, २ मुली झाल्या पोरक्या
14
प्रज्ञासिंह, पुरोहितसह सातही जणांची मुक्तता; मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा १७ वर्षांनी निकाल
15
मृत मुलाला जिवंत करण्यासाठी आईची धडपड; कधी CPR तर कधी ऑक्सिजन दिला, हृदयद्रावक Video व्हायरल
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा २५% टॅरिफचा निर्णय लांबणीवर, काय असणार आता नवी तारीख?
17
५ महिन्याच्या गर्भवतीचे हात-पाय तोडले; दारूच्या नशेत पतीने बेदम मारले, पत्नीची निर्दयी हत्या
18
गॅस सिलिंडर ३४.५० रुपयांनी स्वस्त झाला; १ ऑगस्टपासून हे महत्वाचे चार बदल, पाचवा...
19
आजचे राशीभविष्य १ ऑगस्ट २०२५ : भटकंती कराल, अचानक धनलाभ होईल! असा जाईल आजचा दिवस
20
५ न्यायाधीश, २ तपास यंत्रणा, १७ वर्षे प्रतीक्षा; मालेगाव खटल्यातील सर्व आरोपींची सुटका

नक्षल्यांना कंठस्नान घालणाऱ्या पोलीसांच्या जल्लोषाची चित्रफीत व्हायरल; कुटुंबियांना धोका?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 10:25 IST

सात जहाल नक्षलवाद्यांना कंठस्नान घालणाऱ्या शूरवीर पोलिसांची ओळख जगासमोर आल्याने त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना धोका निर्माण झाला आहे. गडचिरोलीत पोलिसांचे अभिनंदन करताना झालेल्या आनंदोत्सवाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

ठळक मुद्देचित्रफीत पोहचू शकते नक्षल्यांपर्यंतधोक्याची घंटा

नरेश डोंगरे।आॅनलाईन लोकमतनागपूर : सात जहाल नक्षलवाद्यांना कंठस्नान घालणाऱ्या शूरवीर पोलिसांची ओळख जगासमोर आल्याने त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना धोका निर्माण झाला आहे. गडचिरोलीत पोलिसांचे अभिनंदन करताना झालेल्या आनंदोत्सवाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने नक्षलग्रस्त भागातील पोलीस आणि त्यांच्या कुटुंबीयांची ओळख गोपनीय ठेवणे आवश्यक ठरते. मात्र, जल्लोषाच्या नादात पोलीस विभागाकडून ही गंभीर चूक झाली आहे. पोलिसांच्या जल्लोषाचा व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वत्र फिरत आहे. तो सहजपणे नक्षलवादी संघटना आणि समाजातील विविध क्षेत्रात वावरणाऱ्या नक्षलवादी समर्थकांपर्यंतही पोहचला आहे. त्यामुळे जीव धोक्यात घालून नक्षलवाद्यांसोबत दोन हात करणारे पोलीस आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. वरिष्ठ पातळीवरून गोपनीयतेच्या खास सूचना दिल्या जात असताना त्या दुर्लक्षित झाल्याने पोलिसांचे फोटो (व्हिडीओ) नक्षलवाद्यांपर्यंत पोहचल्याने सुरक्षा यंत्रणांमध्येही चर्चेला आले आहे.नक्षलग्रस्त भागात कार्यरत पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची (खास करून कर्मचाऱ्यांची) ओळख सार्वत्रिक होऊ नये, यासाठी खास काळजी घेण्याचे अलिखित आदेश आहेत. कारण नक्षलवादी आणि त्यांचे समर्थक २४ तास जंगलात नसतात. अनेकदा ते शहरात, गावात गर्दीच्या ठिकाणी सहज वावरतात. आवश्यक चीजवस्तूंची खरेदी करण्यासाठी बाजारात, दुकानात सर्वसामान्य माणसासारखे येतात, जातात. अनेकदा ते पोलिसांच्या हालचाली टिपण्यासाठी, ओळख काढण्यासाठी त्यांच्या मागावर असतात. कारण पोलीस आणि पोलिसांच्या खबऱ्यांना नक्षलवादी सर्वात मोठे शत्रू मानतात. त्यामुळे त्यांची ओळख पटवून त्यांचा घात करण्यासाठी, ईजा पोहचवण्यासाठी ते २४ तास संधीची वाट बघत असतात.भरबाजारात पोलीस आणि पोलिसांच्या खबऱ्यांच्या हत्या करण्याच्या अनेक घटना गडचिरोली जिल्ह्यात यापूर्वी घडल्यादेखील आहेत. त्यामुळे पोलिसांची नक्षल्यांना ओळख पटू नये म्हणून, खास काळजी घेतली जाते. त्याचमुळे पोलीस दलात कार्यरत कर्मचारी, अधिकारी जेव्हा जंगलात नक्षल्यांविरुद्ध आॅपरेशन करायला निघतात, तेव्हाच ते गणवेशात (डांगरी घालून) असतात. इतर वेळी कर्तव्यावर असूनदेखील साध्याच कपड्यात सर्वसामान्य माणसासारखे वावरण्याची, दाढी-मिशी वाढलेल्या अवस्थेत फिरण्याची पोलिसांना, जवानांना मुभा असते. बाहेर वावरताना हा पोलीस आहे, हे लक्षात येऊ नये आणि त्यांना धोका होऊ नये, हाच त्यामागे उद्देश असतो. बुधवारी गडचिरोलीतील खुद्द वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीच या उद्देशाला हरताळ फासला आहे. आनंदाने बेभान होऊन आत्मघात करावा, तसा प्रकार केला आहे. जंगलात सात जहाल नक्षलवाद्यांना कंठस्नान घातल्याच्या आनंदाने बेभान झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी नक्षलवाद्यांचे मृतदेह गडचिरोलीत आणल्यानंतर जल्लोष साजरा केला.

धोक्याची घंटानक्षलवाद्यांना टिपणाऱ्या सी-६०, पोलीस आणि नक्षलविरोधी अभियानातील अधिकारी, जवान आणि पोलीस असे सर्व मैदानात एकत्र झाले. त्यांना महिलांनी विजयाचा टिळा लावून गुलाबपुष्प दिले. त्यांचे स्वागत, अभिनंदन करण्यात आले. संदल (बॅण्ड) वाजविण्यात आला. बजरंगबली की जय, तुकाराम बाबा की जय, अशी घोषणाबाजीही करण्यात आली. येथपर्यंत सर्व ठीक होते. मात्र, खरा धोका पुढे आहे.या सर्व आनंदोत्सवाचा, बेभान जल्लोषाचा व्हिडीओ तयार करण्यात आला. हा व्हिडीओ गडचिरोली-गोंदियातील गावागावात सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झाला. क्षणात तो (छत्तीसगड)सह अनेक प्रांतात पोहचला. मध्यप्रदेश, झारखंड आणि अबुझमाडकडच्या नक्षल्यांकडे आणि त्यांच्या हजारो समर्थकांकडेही हा व्हिडीओ पोहचल्याची भीती सूत्रांकडून व्यक्त होत आहे.

डीजीपी म्हणतात, चौकशी करतोविशेष म्हणजे, पोलीस महासंचालक (डीजीपी) सतीश माथुर यांनी गुरुवारी सायंकाळी नागपुरात पत्रकार परिषद घेतली. यावेळी गडचिरोली एन्काऊंटरसंबंधाने ते भरभरून बोलले. नक्षलविरोधी रणनीतीवर बोलताना त्यांनी गोपनीयता आणि सुरक्षेचा मुद्दा पुढे करून अनेक प्रश्नांची उत्तरे देण्याचे टाळले. लोकमतकडे हा व्हिडीओ आहे. त्याचे गांभीर्य लक्षात घेता प्रस्तुत प्रतिनिधीने डीजीपी माथुर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, आपल्याला हा प्रकार माहीत नाही. जर तसे झाले असेल तर आपण त्याची चौकशी करू, असे माथुर म्हणाले.पोलिसांसोबत कुटुंबीयांच्याही सुरक्षेचा प्रश्नपोलिसांनी मोठी कारवाई केल्यानंतर सूडाने पेटलेले नक्षलवादी आक्रमक होऊन घातपाती कृत्य घडवितात, असा आजपर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे या व्हिडीओने वेगळाच धोका निर्माण केला आहे. त्या व्हिडीओत नक्षल्यांविरुद्ध आॅपरेशन यशस्वी करणारे पोलीस, जवान आणि अधिकारी-कर्मचारी, त्यांना समर्थन देणारे शेकडो पोलीस समर्थक, महिला कर्मचारी दिसत आहेत. या व्हिडीओने संबंधित पोलीस अधिकारी-कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबीयांसाठीही मोठा धोका निर्माण केला आहे. या सर्वांचीच तोंडओळख जगजाहीर झाल्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :Policeपोलिसnaxaliteनक्षलवादी