शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
2
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
3
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
4
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
5
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
6
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
7
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
8
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
9
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
10
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
11
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
12
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
13
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
14
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
15
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
16
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
17
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
18
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
19
Tulsi Vivah 2025 Wishes: तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
20
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार

जमीन हडपणाऱ्या भूमाफियाला पोलिसांचे संरक्षण, जमीनमालकालाच केले बेदखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 18:14 IST

वृद्ध, बहीण-भाऊ दहशतीत : न्यायासाठी भटकंती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जमीन हडपणाऱ्या भूमाफियाला आणि त्याच्या साथीदारांना पोलिस पाठीशी घालत आहेत आणि आम्हाला मात्र आमच्याच जमिनीपासून बेदखल केले जात आहे. या संपूर्ण प्रकारामुळे आम्ही दहशतीत आलो आहे. त्यामुळे आता न्यायासाठी अन्नत्याग आंदोलन करणार असल्याची माहिती प्रमिला गायकवाड, रमेश शंकरराव जाधव सुशिला देवीदास गायकवाड यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

भागातील प्रकरण गोरेवाडा जमिनीचे आहे. गायकवाड आणि जाधव यांची वडिलोपार्जित मौजा गोरेवाडा भागात सुमारे आठ एकर जागा आहे. आज तिची किंमत किमान ७० ते ८० कोटी रुपये आहे. गायकवाड भगिनी आणि जाधव यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या आरोपानुसार, भूमाफिया दिलीप ग्वालबंशी, दीपक दुबे आणि रश्मी जोशी यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे या जमिनीवर लेआऊट टाकले आणि प्लॉट विकले. या संबंधाने तक्रार केल्यानंतर पोलिसांनी ग्वालबंशीला अटक केली. तो दोन आठवड्यांनंतर बाहेर आला. तिकडे दुबे आणि जोशीने अटकपूर्व जामीन मिळवला. त्यानंतर ग्वालबंशीने आपले साथीदारामार्फत प्रमिला गायकवाड यांच्या भावाला मारहाण, धमकी देऊन दशहत निर्माण केली. विशेष म्हणजे, कोट्यवधींची ही जमीन हडपण्यात एक मोठी टोळी असून, त्यात अनेक जण गुंतले आहेत. पोलिस मात्र थातूरमातूर चौकशी करून अनेकांना कारवाईपासून दूर ठेवत आहेत. आपल्या मालकीच्या जमिनीवर जाण्यासाठी आम्हाला मज्जाव केला जातो. धमक्या मिळतात. पोलिस मात्र आता आमच्या तक्रारींना बेदखल करीत आहेत. त्यामुळे आम्ही दहशतीत आलो आहोत, असे या बहीण-भावांनी स्पष्ट केले.

आयुक्तांना भेटूच दिले जात नाही

  • आरोपी गुन्हेगारी वृत्तीचे आहेत. त्यांच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असून, पोलिस त्यांच्यावर कडक कारवाई करायला तयार नाहीत. आम्ही न्यायासाठी भटकंती करीत आहोत.
  • पोलिस आयुक्तांना भेटून त्यांना हा प्रकार ऐकवण्यासाठी वारंवार सीपी ऑफिसमध्ये जातो. मात्र, आम्हाला आयुक्तांची भेटच घेऊ दिली जात नसल्याचा आरोपही अर्जदारांनी केला आहे.
  • गुंडांच्या हातून मरण्यापेक्षा आम्ही गरीब आणि वृद्ध आहोत. न्यायासाठी अन्नत्याग आंदोलन करणार आहोत. तसे पत्र आम्ही विशेष शाखेच्या पोलिस उपायुक्तांना दिले आहे. जिवंत असेपर्यंत न्याय मिळाला नाही, तर अन्नत्याग करून आम्ही स्वतःचा शेवट करणार असल्याची भावनाही त्यांनी पत्रकारांसमोर बोलून दाखविली.
English
हिंदी सारांश
Web Title : Land grabbers protected by police; landowners displaced, allege victims.

Web Summary : Nagpur residents allege land mafia, aided by police, seized ancestral land worth crores using forged documents. Victims claim threats, denial of access, and police inaction, forcing them to hunger strike for justice.
टॅग्स :nagpurनागपूरCrime Newsगुन्हेगारी