शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस अधिकारी का टिकत नाहीत?

By admin | Updated: January 6, 2017 02:22 IST

गेल्या २४ तासांत नागपुरातील सहपोलीस आयुक्त संतोष रस्तोगी, अतिरिक्त आयुक्त प्रतापसिंह पाटणकर

बदल्यांचा पोरखेळ नागपुरात कशी टिकेल कायदा व सुव्यस्था २४ तासांत चार बदल्या नरेश डोंगरे   नागपूर गेल्या २४ तासांत नागपुरातील सहपोलीस आयुक्त संतोष रस्तोगी, अतिरिक्त आयुक्त प्रतापसिंह पाटणकर, उपायुक्त एम. राजकुमार आणि उपायुक्त जी. श्रीधर या चार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बदली झाली. महाराष्ट्राची उपराजधानी आणि मुख्यमंत्र्यांचे गृहनगर असलेल्या नागपुरात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मुदतीच्या आतच बदल्या होत आहेत. यापूर्वी अतिरिक्त आयुक्त सुहास वारके यांचीही अशीच ध्यानीमनी नसताना तीनच महिन्यात नागपुरातून बदली झाली होती. त्यामुळे कायदा व सुव्यस्था सांभाळण्यास हे अधिकारी कमी पडतात की नागपूरपेक्षा दुसऱ्या ठिकाणी त्यांची जास्त गरज आहे, असा प्रश्न चर्चेला आला आहे. सोबतच वारंवार होणाऱ्या या मुदतपूर्व बदल्यांमुळे नागपुरातील कायदा व सुव्यवस्था कशी टिकेल आणि मुख्यमंत्र्यांच्या स्वप्नातील हे शहर कसे आकारास येईल, असाही प्रश्न उपस्थित झाला आहे. नागपूरच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:ला झोकून दिले आहे. मिहान, मेट्रोसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासोबत उपराजधानीत अत्याधुनिक साधनसुविधा निर्माण करण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. नागपुरातील पोलीस दल आधुनिक तसेच सक्षम करण्यासाठीही त्यांनी शक्य ते सर्व प्रयत्न चालवले आहेत. मात्र, कायदा व सुव्यस्था राखण्याची प्रत्यक्ष जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे, त्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या वारंवार मुदतीच्या आत बदल्या होत असल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांच्या गृहखात्याबद्दल नकारात्मक संदेश जाण्याची भीती आहे. सहपोलीस आयुक्त म्हणून संतोष रस्तोगी अवघ्या पाच महिन्यांपूर्वी नागपुरात रुजू झाले. केंद्रात प्रतिनियुक्तीवर असताना बहुचर्चित २जी स्पेक्ट्रम घोटाळ्याचा तपास रस्तोगी यांनी केला. अत्यंत हुशार अन् सौजन्यशील अधिकारी म्हणून रस्तोगी ओळखले जातात. नागपुरातील बहुचर्चित डब्बा प्रकरणाच्या तपासात त्यांची मोलाची मदत होईल, अशी अपेक्षा असतानाच त्यांची गुरुवारी अचानक बदली झाली. रस्तोगी यांच्या बदलीच्या २४ तासपूर्वी परिमंडळ तीनचे उपायुक्त एम. राजकुमार आणि परिमंडळ चारचे उपायुक्त जी. श्रीधर यांची अनुक्रमे यवतमाळ आणि बीडला पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली. हे दोन्ही अधिकारी जून २०१५ मध्ये नागपुरात रुजू झाले होते. दोघेही तरुण अन् धडाकेबाज अधिकारी होते. त्यांच्या त्यांच्या परिमंडळात त्यांनी नुकताच कुठे धाक निर्माण केला होता. आता त्यांची बदली झाल्याने पुन्हा एकदा या दोन्ही परिमंडळातील गुन्हेगार सैराट सुटण्याची भीती निर्माण झाली आहे. या सर्वांवर कळस म्हणजे, दोन आठवड्यांपूर्वी नागपुरात अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून रुजू झालेले प्रतापसिंह पाटणकर यांचीही बदली झाली आहे. पदोन्नतीवर त्यांना नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. यापूर्वी आॅगस्टमध्ये रुजू झालेले अतिरिक्त आयुक्त सुहास वारके यांची अवघ्या तीन महिन्यात येथून बदली झाली होती. विशेष म्हणजे नागपुरात काही पोलीस अधिकारी असे आहेत की ज्यांच्या सेवाकाळाची मुदत कधीचीच पूर्ण झाली आहे. त्यांना त्यांच्या बदलीच्या आदेशाची प्रतीक्षा आहे. मात्र, त्यांची बदली होण्याचे नाव नाही. त्यामुळे ‘हे अधिकारी’ नागपुरात अपेक्षेपेक्षा जास्त चांगले काम करीत असल्यामुळे त्यांची बदली केली जात नसल्याचे बोलले जात आहे.