शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
2
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
3
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध
4
सावध व्हा, ‘कॉल मर्जिंग स्कॅम’ धाेका ! नव्या पद्धतीने केवळ काही अवधीत लाखो रुपयांवर डल्ला
5
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
6
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
7
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
8
काँग्रेसमध्ये महापालिकेसाठी इच्छुकांची गर्दी; आले ४५० अर्ज, इच्छुकांकडून ५०० रुपये शुल्क
9
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
10
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
11
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
12
अर्बन कंपनी सर्च केले आणि ऑनलाइन मेड मागविली; महिलेचे खातेच झाले रिकामे
13
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
14
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
15
संभाव्य दुबार मतदारांची तपासणी करा; राज्य निवडणूक आयोगाचे मतदार याद्यांबाबत आदेश
16
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
17
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
18
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
19
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
20
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?

नागपुरात विदर्भवाद्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज,एक कार्यकर्ता जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 17:12 IST

स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी महाराष्ट्र दिनी (१ मे ) काढण्यात आलेल्या मोर्चावर पोलिसांनी लाठीचार्ज केला. पोलिसांच्या या लाठीचार्जमध्ये एक कार्यकर्ता जखमी झाला.

ठळक मुद्देज्येष्ठ नेते वामनराव चटपांसह शेकडो ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी महाराष्ट्र दिनी (१ मे ) काढण्यात आलेल्या मोर्चावर पोलिसांनी लाठीचार्ज केला. पोलिसांच्या या लाठीचार्जमध्ये एक कार्यकर्ता जखमी झाला. रक्तबंबाळ अवस्थेतच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि नंतर त्याची सुटका करण्यात आली. विदभार्वाद्यांच्या या मोर्चात पोलिसांनी बळाचा वापर केला आणि मोचार्ला पांगविण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी ज्येष्ठ विदर्भवादी नेते वामनराव चटप, राम नेवले, प्रबीरकुमार चक्रवती, माजी आमदार सरोज काशीकर, अ‍ॅड. नंदा पराते, डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.विदर्भवादी संघटना महाराष्ट्र दिन हा काळा दिवस म्हणून पाळतात. त्याअनुषंगाने विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या नेतृत्वात चौदा विदर्भवादी संघटनानी नागपुरात भव्य मोचा काढला. भर दुपारी ४५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त उन्हात विदर्भवादी रस्त्यावर उतरले आणि विदर्भाच्या मागणीसाठी मोर्चा काढला. यशवंत स्टेडीयम येथून दुपारी एक ते दीड वाजताच्या दरम्यान मोचार्ला प्रारंभ झाला. विदर्भवादी नेते व माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप, विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कोअर कमिटीचे वरिष्ठ सदस्य व अर्थतज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले, निमंत्रक राम नेवले, प्रबीर चक्रवर्ती, नागपूर जिल्हा अध्यक्ष अरुण केदार, विदर्भ महिला आघाडी अध्यक्ष अ‍ॅड. नंदा पराते, पश्चिम विदर्भ महिला आघाडीच्या रंजना मामर्डे, अ‍ॅड. गोविंद भेंडारकर, शहराध्यक्ष राजू नागुलवार यांच्यासह शेकडो कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले. जय विदर्भचे फलक घेतलेले कार्यकर्ते घोषणा देत बँक आॅफ महाराष्ट्र मार्गे झाशी राणी चौक, सीताबर्डी मेन रोड, लोखंडी पूल, टेकडी गणेश ओव्हरब्रीज, जयस्तंभ चौक मार्गे परवाना भवन चौक येथे पोहोचले. यशवंत स्टेडियमवरुन विधानभवनाच्या दिशेने निघालेल्या मोचार्ला पोलिसांनी कस्तूरचंद पार्कजवळ थांबवले. यावेळी विदर्भवादी कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या बॅरिकेट्सवरुन विधानभवनाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करावा लागला. यात रवी वानखेडे हा कार्यकर्ता जखमी झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अटकसत्र सुरु केले. ज्येष्ठ नेत्यांसह शेकडो कार्यकर्त्यांना अटक केली. सायंकाळच्या सुमारास सर्वांची सुटका करण्यात आली.मानवाधिकार आयोगाकडे तक्रार करूपोलिसांचा आणि राज्य सरकारचा आम्ही निषेध करतो. वेगळा विदर्भ देण्याचे मोदी, गडकरी आणि फडणवीस यांच्यात नाही बळ, आता सर्व सोडून पळ, असे अ‍ॅड. वामनराव चटप म्हणाले. एक कार्यकर्ता या आंदोलनात जखमी झालेला आहे. आम्ही मानवाधिकार आयोगाला कळवू. त्यानुसार कायदेशीर कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.पोलिसांनीच बळजबरी केलीमोर्चात जखमी झालेल्या युवकाचे नाव रवी वानखेडे असे होते. आम्ही शांतपणे आंदोलन करीत होतो. पण पोलिसांनीच बळजबरी केली आणि माझ्यावर हल्ला केला, असे रवी वानखेडे यावेळी म्हणाला.अखेर झेंडा फडकलाविदर्भवादी आंदोलक विधानभवनावर झेंडा फडकवण्यासाठीच रस्त्यावर उतरले होते. पण पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवल्यामुळे झेंडा फडकवणे कठीण होवून बसले होते. अखेर काही युवा कार्यकर्त्यांनी एक शक्कल लढवली आणि द्रोण विमानाच्या माध्यमातून विधानभवन परिसरातील एका झाडावर विदर्भाचा झेंडा फडकवण्यात आला.

 

टॅग्स :Vidarbhaविदर्भagitationआंदोलन