नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 21:43 IST2025-08-21T21:43:28+5:302025-08-21T21:43:59+5:30

पुणे, मध्यप्रदेशातून पोहोचले ग्राहक, गुन्हे शाखेची अवैध डान्सबारवर कारवाई

Police have action on Dance Bar in Nagpur, case registered against 25 people | नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा

नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा

योगेश पांडे

नागपूर : नागपुरात एका बारमध्ये सुरू असलेल्या अश्लील नृत्य व तरुणींवर पैसे उधळण्याच्या प्रकाराचा पोलिसांनी भंडाफोड केला आहे. संबंधित अवैध डान्सबारमध्ये पोहोचलेल्या २० हून अधिक ग्राहकांसह २५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेथे तीन तरुणी तोकड्या कपड्यांमध्ये अश्लिल नृत्य करत होत्या. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध पथकाने गुरुवारी मध्यरात्री ही कारवाई केली.

जुनी कामठी मार्गावरील उड्डाणपुलाजवळ असलेल्या शिवशक्ती बारमध्ये हा ‘छमछम’चा प्रकार सुरू होता. पोलिसांनी खबऱ्यांकडून याची माहिती मिळाली. तेथे अश्लिल नृत्य सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी रात्री एक वाजताच्या सुमारास तेथे धाड टाकली. तेथे तीन तरुणी तोकड्या कपड्यांत नृत्य करत होत्या व त्यांच्यावर तेथील ग्राहक पैसे उधळत होते. पोलिसांची धाड पडताच तेथे अफरातफर माजली व अनेकांनी पळण्याचा प्रयत्न केला. मात्र बाहेरदेखील पोलिसांचे पथक उपस्थित होते.

पोलिसांनी बारचे मालक गोपाल उर्फ पप्पु चंपालाल यादव (५४) व त्याचा मुलगा दिप यादव (३०, इतवारी रेल्वे स्थानकाजवळ, शांतीनगर), बारचा व्यवस्थापक गुलाब ताराचंद राहांगडाले (३८, एकात्मता नगर, हिंगणा मार्ग) यांना ताब्यात घेतले. आरोपींकडे कुठलाही परवाना नसताना हा प्रकार सुरू होता.
बारमध्ये असलेले संजय सिताराम बारापात्रे (५९, नंदनवन), प्रदीप शंकरराव गोंडाणे (५४, बेलतरोडी), प्रदीप प्रल्हाद गजभिये (५७, सुगतनगर), रमेश शांताराम मल्लेवार (४३, समतानगर), सचिन अजाबराव भुसारी (४०, तोंडाखैरी, धापेवाडा), जितेंद्र लोकचंद राहांगडाले (३३, खैरी, मध्यप्रदेश), सुबोध बापुराव पगाडे (४०, किल्ला रोड, महाल), अतुल महेकराव कटरे (२४, एकात्मतानगर, हिंगणा), मयुर दिपक डहाळे (३५, विद्या नगर), सौरभ शिवराज दहीवाळ (४६, वसमत रोड, परभणी), पवन लक्ष्मीकांत देशपांडे (३५, पुणे), अनिल गोविंद कांबळे (५०, पुणे), सूरज महादेवराव दवाळे (३५, रागोरगाव मेघे, वर्धा), अभय शांताराम घाटोळे (५२, जुनी मंगळवारी), शेरू कमलाकर चिंचधरे (३०, जुनी मंगळवारी), विजेंद्र रामनाथ शाहु (३५, संत तुकाराम नगर), राहुल
प्रभाकर सपकाळ (३५, मेहंदीबाग), हितेश मस्तराम ठाकुर (३२, कळमना), प्रफुल्ल सुरदास चव्हाण (५०, रामकृष्णनगर), विकास गणेशराव काळे (३६, गणेश नगर, वर्धा), रामनाथ नागनाथ दिल्लीकर (४०, यादगीर, कर्नाटक), मुकेश मुलचंद यादव (५४, परासिया, छिंदवाडा) यांच्याविरोधातदेखील गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी तेथून रोख ४६ हजार, तीन दुचाकी, दोन कार, २४ मोबाईल असा २८ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. सर्व आरोपींना कळमना पोलीस ठाण्याच्या हवाली करण्यात आले. पोलीस निरीक्षक ललिता तोडासे, गजेंद्रसिंग ठाकूर, शाम अंगुथलेवार, सचिन श्रीरामे, दीपक बिंदाणे, विलास चिंचुलकर, अश्विनी खोडपेवार, जितेशाचारी आरवेल्ली, युवानंद कडू, अभिषेक शनवारे, महेश काटवले यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: Police have action on Dance Bar in Nagpur, case registered against 25 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.