पासपोर्ट जप्तीचा अधिकार पोलिस, न्यायालयाला नाही

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: January 10, 2025 11:11 IST2025-01-10T11:10:42+5:302025-01-10T11:11:34+5:30

हायकोर्ट : पासपोर्ट अधिकाऱ्यांनाच अधिकार

Police, court do not have the authority to confiscate passports | पासपोर्ट जप्तीचा अधिकार पोलिस, न्यायालयाला नाही

Police, court do not have the authority to confiscate passports

राकेश घानोडे 
लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर :
मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठातील न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फलके यांनी एका प्रकरणात अतिशय महत्वपूर्ण निर्णय देताना पोलिस व न्यायालयाला पासपोर्ट जप्त करण्याचा अधिकारच नाही, असे स्पष्ट केले.


फौजदारी प्रक्रिया संहितेमधील कलम १०२ अंतर्गत पोलिसांना व कलम १०४ अंतर्गत फौजदारी न्यायालयाला गुन्ह्याशी संबंधित वस्तू जप्त करण्याचा अधिकार आहे. परंतु, पासपोर्ट जप्तीकरिता पासपोर्ट कायदा लागू होतो. हा विशेष कायदा आहे. त्यामुळे या कायद्याचीच अंमलबजावणी करणे बंधनकारक आहे. या कायद्यातील कलम १० (३) (ई) अनुसार केवळ पासपोर्ट अधिकारीच पासपोर्ट जप्त करू शकतात, असे उच्च न्यायालयाने नमूद केले. 

२ जून २०१७ रोजी सीबीआयच्या आर्थिक गुन्हे शाखेने बँक ऑफ बडोदाच्या फसवणूक प्रकरणामध्ये नागपुरातील गोकुळपेठ येथील चित्रपट लेखक व निर्देशक संदीप केवलानी याच्यासह इतर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, सीबीआयने फौजदारी प्रक्रिया संहितेमधील कलम १०२ अंतर्गतच्या अधिकाराचा वापर करून केवलानीचा पासपोर्ट जप्त करून विशेष सत्र न्यायालयात सादर केला. त्यानंतर या न्यायालयाने फौजदारी प्रक्रिया संहितेमधील कलम १०४ अंतर्गतचे अधिकार वापरून तो पासपोर्ट स्वतःच्या ताब्यात घेतला. उच्च न्यायालयाने सीबीआय व सत्र न्यायालयाची ही कारवाई अवैध ठरविली. 


प्रकरण काय? 

  • २०१७ मध्ये सीबीआयच्या आर्थिक गुन्हे शाखेने बँक फसवणूक प्रकरणामध्ये नागपुरातील चित्रपट लेखक संदीप केवलानी व इतर आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला. 
  • सीबीआयने फौजदारी प्रक्रिया संहितेतील कलम १०२ अंतर्गत अधिकाराचा वापर करून केवलानीचा पासपोर्ट जप्त करून न्यायालयात सादर केला. न्यायालयाने याच संहितेतील कलम १०४ चे अधिकार वापरून पासपोर्ट स्वतःच्या ताब्यात घेतला. उच्च न्यायालयाने सीबीआय व सत्र न्यायालयाची ही कारवाई अवैध ठरविली.

 

Web Title: Police, court do not have the authority to confiscate passports

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.