नागपुरात पोलीस शिपायाने केला महिलेवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 14:23 IST2018-01-15T14:22:12+5:302018-01-15T14:23:05+5:30

पिस्तुलाच्या धाकावर एका महिलेला मारहाण करून आणि मुलीला ठार मारण्याची धमकी देऊन एका पोलीस शिपायाने सोनेगावमधील महिलेवर (वय २३) बलात्कार केला. शनिवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते.

Police constable raped on woman in Nagpur |  नागपुरात पोलीस शिपायाने केला महिलेवर बलात्कार

 नागपुरात पोलीस शिपायाने केला महिलेवर बलात्कार

ठळक मुद्देपिस्तुलाचा धाक, मुलीला ठार मारण्याची धमकी : आरोपी जाधव गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पिस्तुलाच्या धाकावर एका महिलेला मारहाण करून आणि मुलीला ठार मारण्याची धमकी देऊन एका पोलीस शिपायाने सोनेगावमधील महिलेवर (वय २३) बलात्कार केला. शनिवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. रवी ओमकार जाधव (वय २५) असे आरोपीचे नाव असून त्याला सोनेगाव पोलिसांनी अटक केली आहे.
आरोपी जाधव हा मुख्यालयातील पोलीस कर्मचारी आहे. ठाकूर नामक बिल्डरचा सुरक्षा रक्षक म्हणून त्याची नियुक्ती झाली आहे. तो अविवाहित असून आईवडिलांसोबत सोनेगाव परिसरात राहतो. त्याच्या बाजूलाच तक्रारकर्त्या महिलेचे घर आहे. तिचा पती खासगी कंपनीत काम करतो. तिला एक वर्षाची मुलगी आहे. शनिवारी रात्री ८.३० च्या सुमारास ती घरात स्वयंपाक करीत असताना आरोपी जाधव तिच्या घरात शिरला. तिला पिस्तुलाचा धाक दाखवून शरीरसंबंधांची मागणी केली. महिलेने नकार दिल्यामुळे पोलिस शिपायाने केला महिलेवर बलात्कार
तिच्या मुलीला ठार मारण्याची धमकी दिली. त्यालाही ती मानत नसल्याचे पाहून तिच्या पतीच्या पॅन्टला अडकवलेला पट्टा काढून महिलेला मारहाण केली आणि तिच्यावर बलात्कार केला. रात्री ८.४५ च्या सुमारास महिलेचा पती कर्तव्यावरून परतला तेव्हा त्याला नको तो प्रकार घरात दिसला. त्यानंतर आरोपी पळून गेला. महिलेच्या पतीने आरडाओरड केल्यामुळे शेजारी गोळा झाले. त्यांना हा प्रकार कळल्याने परिसरात संतापजनक वातावरण निर्माण झाले. दरम्यान, सोनेगाव पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी महिलेकडून माहिती ऐकून घेतल्यानंतर तिला ठाण्यात नेले. तेथे तिची तक्रार नोंदवून घेतल्यानंतर आरोपी पोलिसाविरुद्ध बलात्कार, मारहाण करून धमकी देणे तसेच शासकीय पिस्तुलाचा गैरवापर केल्याप्रकरणी विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला.
ठाण्यात गर्दी, वरिष्ठही पोहचले
या घटनेची माहिती कळताच पोलीस दलात खळबळ निर्माण झाली. ठाणेदार संजय पांडे घटनास्थळी पोहचले. आरोपीला लगेच अटक करण्यात आली. परिमंडळ दोनचे उपायुक्त राकेश ओला, गुन्हे शाखेचे उपायुक्त संभाजी कदम यांनीही सोनेगाव ठाण्यात रात्री धाव घेतली. त्यांनी तक्रारकर्त्या महिलेकडून माहिती ऐकून घेतली. दरम्यान, रविवारी आरोपी जाधवला न्यायालयात हजर करून त्याचा १७ जानेवारीपर्यंत पीसीआर मिळवण्यात आला. या घटनेमुळे पोलीस दलात आणि परिसरातही उलटसुलट चर्चा सुरू आहे.

Web Title: Police constable raped on woman in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.