नागपुरात पोलिसांचे ४८ तास कोम्बिंग ऑपरेशन, ३०५ गुन्हेगारांची झाडाझडती

By योगेश पांडे | Updated: April 25, 2025 01:31 IST2025-04-25T01:31:03+5:302025-04-25T01:31:24+5:30

पोलिसांनी केवळ त्यांची तपासणीच केली नाही, तर प्रत्येक गुन्हेगारासोबत तपास पथकाने फोटो काढून त्याचा अहवालदेखील तयार केला आहे.

Police conduct 48-hour combing operation in Nagpur, nab 305 criminals | नागपुरात पोलिसांचे ४८ तास कोम्बिंग ऑपरेशन, ३०५ गुन्हेगारांची झाडाझडती

नागपुरात पोलिसांचे ४८ तास कोम्बिंग ऑपरेशन, ३०५ गुन्हेगारांची झाडाझडती

नागपूर : शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण राहावे यासाठी नागपूर पोलिसांनी ४८ तास कोम्बिंग ऑपरेशन राबविले. या दरम्यान पोलिसांनी ३३ पोलिस ठाण्यांअंतर्गत असलेल्या ३०५ गुन्हेगार व हिस्ट्रीशीटर्सची झाडाझडती घेतली. पोलिसांनी केवळ त्यांची तपासणीच केली नाही, तर प्रत्येक गुन्हेगारासोबत तपास पथकाने फोटो काढून त्याचा अहवालदेखील तयार केला आहे.

पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी पाचही परिमंडळाच्या उपायुक्तांना कोम्बिंग ऑपरेशन राबविण्याची सूचना केली होती. त्याअंतर्गत नाकाबंदी, ऑपरेशन ऑल आउटदेखील राबविण्यात आले. यात एमपीडीए, मकोका, इत्यादी कारवाई झालेल्या गुन्हेगारांच्या घरी जाऊन पाहणी करण्यात आली. पोलिसांनी एकूण ३०५ आरोपींची झडती घेतली. त्यात हद्दपारीची कारवाई झालेले १०३, मकोकाची कारवाई झालेले १८, हिस्ट्रीशीटर १९, इतर गुन्हेगार २५, इत्यादींचा समावेश होता. सर्व आरोपींची सिंबा आयडी अपडेट आहे की नाही, याचीदेखील खातरजमा करण्यात आली.

काही आरोपी पत्त्यावरून फरार
या ऑपरेशनदरम्यान पोलिसांना काही गुन्हेगार त्यांच्या पत्त्यावर आढळलेच नाही. ते गुन्हेगार घर सोडून बाहेरगावी गेल्याची किंवा फरार झाल्याची बाब समोर आली. काही गुन्हेगार हे हातमजुरी, पाणीपुरीचे ठेले चालवणे, बाहेरील जिल्ह्यात शिक्षण घेणे, पेंटिंगचे काम करणे, आजारी असल्याचे निदर्शनास आले. या अभियानादरम्यान वाडी पोलिस स्टेशनअंतर्गत ऋषभ वासुदेव गवई (वय २७) व श्याम सुभाष आत्राम (२३) यांना अटक करण्यात आली.

व्हिडीओ कॉलवरून संपर्क
पोलिस उपायुक्त महेक स्वामी यांनीदेखील रेकॉर्डवरील आरोपी मोहम्मद शकील आणि खुनाच्या गुन्ह्यातून कारागृहातून बाहेर आलेला अभय नावाचा आरोपी यांची तपासणी केली व प्रतिबंधक कारवाई केली. बेलतरोडी पोलिस स्टेशनच्या हद्दीत हिस्ट्रीशीटर आरोपी रामस्वरूप हा पत्त्यावर आढळला नाही. त्याच्याशी व्हिडीओ कॉलद्वारे संपर्क साधण्यात आला. तो अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथे पेेंटिंगचे काम करत असल्याची बाब समोर आली.

Web Title: Police conduct 48-hour combing operation in Nagpur, nab 305 criminals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस