शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
3
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
4
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
5
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
6
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
7
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
8
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
9
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
10
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
11
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
12
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
13
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
14
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
15
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...
16
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
17
'ही' साऊथ अभिनेत्री, जी प्रेमासाठी बनली वयानं २७ वर्ष मोठ्या असलेल्या माजी CM ची दुसरी पत्नी
18
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
19
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
20
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी

नागपुरात  गुडांकडून पोलिसांवर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2020 12:53 AM

क्रिकेट खेळण्यापासून मनाई केल्यामुळे आरोपींनी पोलिसांवरच हल्ला केला. गेल्या तीन दिवसातील ही दुसरी घटना आहे.

ठळक मुद्देतीन दिवसात दुसरी घटना

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : क्रिकेट खेळण्यापासून मनाई केल्यामुळे आरोपींनी पोलिसांवरच हल्ला केला. गेल्या तीन दिवसातील ही दुसरी घटना आहे.ही घटना वर्धा रोडवरील खापरी येथे घडली. सोनेगाव पोलीस ठाण्याचे शिपाई सूरज निंबाळकर मंगळवारी रात्री ७.३० वाजता खापरी परिसरात पेट्रोलिंग करीत असताना आपल्या दुचाकीने जात होते. त्यांना काही युवक रस्त्यावर क्रिकेट खेळताना दिसून आले. सूरज यांनी त्यांना मनाई केल्याने ते निघूनही गेले. त्यानंतर सूरज गस्त घालत मेट्रो स्टेशनकडे निघाले. ते परत गेल्यावर तेच युवक रस्त्यावर बसलेले दिसले. सूरजने त्यांना घरी जाण्यास सांगितले. त्यावेळी त्यांच्यातील सय्यद अली, त्याचा भाऊ अमजद अली व राज नेवारे हे संतप्त झाले. त्यांनी शिवीगाळ करीत सूरजवर हल्ला केला. त्याला लाथाबुक्कीने मारत दगड मारून जखमी करून ते फरार झाले. याची माहिती सोनेगाव व बेलतरोडी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला. आरोपी सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुख्यात गुन्हेगार आहे. लॉकडाऊन दरम्यान पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याची तीन दिवसातील ही दुसरी घटना आहे. शनिवारी कळमना येथील विजयनगरमध्ये क्रिकेट खेळणाऱ्यांना मनाई केल्याने पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला करण्यात आला. पोलीस लॉकडाऊन यशस्वी करण्यासाठी २४ तास रस्त्यावर ड्युटी करीत आहे, अशात त्यांच्यावर हल्ले करणे गंभीर बाब आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस