शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
2
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
3
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
5
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
6
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
7
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
8
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
9
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
10
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
11
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
12
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
13
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
14
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
15
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
16
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
17
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
18
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
19
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
20
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल

नागपुरात नायलॉन मांजा विक्रेत्यांची धरपकड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 12:05 AM

नायलॉन मांजाची विक्री करून नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्यांविरोधात नागपूर पोलिसांनी मोहीम सुरू केली आहे. पोलिसांनी महिलेसह आठ जणांना नायलॉन मांजाच्या अवैध विक्रीप्रकरणी अटक केली व त्यांच्याकडून पावणेदोन कोटींचा मांजा जप्त केला. या कारवाईमुळे नायलॉन मांजा विक्रेत्यांमध्ये खळबळ माजली आहे. नंदनवन पोलिसांनी ही कारवाई केली.

ठळक मुद्देमहिलेसह आठ जणांना अटक : पावणेदोन कोटींचा माल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नायलॉन मांजाची विक्री करून नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्यांविरोधात नागपूर पोलिसांनी मोहीम सुरू केली आहे. पोलिसांनी महिलेसह आठ जणांना नायलॉन मांजाच्या अवैध विक्रीप्रकरणी अटक केली व त्यांच्याकडून पावणेदोन कोटींचा मांजा जप्त केला. या कारवाईमुळे नायलॉन मांजा विक्रेत्यांमध्ये खळबळ माजली आहे. नंदनवन पोलिसांनी ही कारवाई केली.२४ वर्षीय रोहिना बी मो.युनूसचे हसनबाग येथे किराणा दुकान आहे. येथे नायलॉन मांजाची विक्री होत असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. याआधारावर पोलीस निरीक्षक विनायक चव्हाण, एपीआय पंकज धाडगे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय एच.एस.थोरात, स्नेहलता जायेभाये, महादेव थोटे, श्रीकांत साबळे यांनी दुकानावर धाड टाकली व १ लाख २६ हजार रुपयांचा नायलॉन मांजा जप्त केला. दुकानात ७५६ बंडल होती. पोलिसांनी रोहिनाला अटक केली. सक्करदरा पोलिसांनी पवन अनिल महाजन (२२) सरस्वतीनगर, अतुल कोठीराम देवगडे (२४) कामठी, अब्दुल नईम अब्दुल गनी (५१) सरताज कॉलनी तसेच जकीर हैदर अली खान (२८) आझाद कॉलनी, ताजाबाद यांना अटक केली व साडेपाच हजार रुपयांचा नायलॉन मांजा जप्त केला. मानकापूर पोलिसांनी महादेव विठोबाजी राऊत (५७) गीतानगर याला अटक केली व ३ हजार ३०० रुपयांचा मांजा जप्त केला.याच पद्धतीने झोन पाचचे पोलीस उपायुक्त हर्ष पोद्दार यांच्या विशेष दलाने सोमवारी दोन युवकांना नायलॉन मांजासह अटक केली. पोलिसांनी यशोधरा ठाणे परिसरात मोटरसायकलवरील ललित सावतकर (२५) कोलबास्वामी कॉलनी याला पकडले. त्याच्याकडे नायलॉन मांजाच्या चार चक्री सापडल्या. ललितच्या घरीच पतंगांचे दुकान आहे. कळमना येथील गुलशननगरात राहणाऱ्या रिकेश शंकर पारशिवनीकर यालादेखील अटक करण्यात आली. त्याने नायलॉन मांजाच्या चार चक्री घरी लपवून ठेवल्या होत्या.कठोर कारवाई करणार : पोलीस आयुक्तनागरिकांनी नायलॉन मांजाचा वापर करू नये, असे आवाहन पोलीस आयुक्त डॉ.भूषणकुमार उपाध्याय यांनी केले आहे. नायलॉन मांजामुळे अपघात होऊ शकतात. निष्पाप लोकांचा जीव जाऊ शकतो. याचा वापर झाला तर कठोर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी पतंग उडविताना शांती भंग होणार नाही याची काळजी घ्यावी, असेदेखील त्यांनी सांगितले.

टॅग्स :kiteपतंगraidधाड