नागपुरात पोलीस आणि मनपा करणार कोरोनाचा सामना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2020 10:02 PM2020-05-09T22:02:46+5:302020-05-09T22:06:11+5:30

संघटितपणे सक्तीच्या उपाययोजना राबवून कोरोनाचा मुकाबला करण्याचा निर्णय पोलीस आणि महापालिका प्रशासनाने संयुक्तरीत्या घेतला आहे.

Police and Municipal Corporation will face Corona in Nagpur | नागपुरात पोलीस आणि मनपा करणार कोरोनाचा सामना

नागपुरात पोलीस आणि मनपा करणार कोरोनाचा सामना

Next
ठळक मुद्देसंयुक्त बैठकीत निर्णय : प्रभावी उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : संघटितपणे सक्तीच्या उपाययोजना राबवून कोरोनाचा मुकाबला करण्याचा निर्णय पोलीस आणि महापालिका प्रशासनाने संयुक्तरीत्या घेतला आहे. नागपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव सारखा वाढत आहे. तो रोखण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्या पुढाकाराने शुक्रवारी एक बैठक घेण्यात आली. त्यात महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे आणि विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत पोलीस आणि महापालिका प्रशासनाच्या समन्वयातून एक सर्वोत्तम तसेच प्रभावी टीमवर्क तयार करण्यावर भर देण्यात आला.
महापालिकेद्वारा करण्यात येणाऱ्या आवश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी काय व कशाप्रकारे नियोजन करायचे त्यावर बैठकीत विचारविमर्श करण्यात आला. त्याच प्रमाणे दिलेल्या दिशानिर्देशांचे उल्लंघन करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याचेही ठरले. वैद्यकीय तसेच महापालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसोबत कोविड योद्ध्यांच्या सुरक्षेचा मुद्दा चर्चेला आला. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ही मंडळी अविरत परिश्रम घेत असताना काही ठिकाणी समाजकंटकांकडून त्यांच्यावर हल्ला होत आहे. त्यामुळे अशा समाजकंटकांवर कडक कारवाई करण्याचाही निर्णय घेण्यात आला. विविध विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना यावेळी कोरोनाच्या संसर्गाला रोखण्यासाठी ठरविण्यात आलेल्या उपाययोजनाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देशही या बैठकीत विविध विभागाच्या अधिकाºयांना देण्यात आले व त्याची अंमलबजावणी शनिवारपासून करण्यात आली.

Web Title: Police and Municipal Corporation will face Corona in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.