नागपुरातील कळमनात विष तर प्रतापनगरात रॉकेल पिऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 20:30 IST2020-05-21T20:28:14+5:302020-05-21T20:30:49+5:30
कळमन्यात एका तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केली. तर प्रताप नगरात एका व्यक्तीने रॉकेल पिऊन आपली जीवनयात्रा संपविली.

नागपुरातील कळमनात विष तर प्रतापनगरात रॉकेल पिऊन आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कळमन्यात एका तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केली. तर प्रताप नगरात एका व्यक्तीने रॉकेल पिऊन आपली जीवनयात्रा संपविली.
कळमन्यातील डिप्टी सिग्नल, बाजार चौकाजवळ राहणारे आसकरण शाहू (वय २५) याने १८ मेच्या रात्री ७ च्या सुमारास विष प्राशन केले. त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला उपचाराकरिता मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास डॉक्टरांनी शाहूला मृत घोषित केले. मिळालेल्या सूचनेवरून कळमना पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. त्याच्या आत्महत्येमागचे कारण शोधले जात आहे.
त्याचप्रमाणे सुभाषनगर, बुद्धविहाराजवळ राहणारे रामलाल छोटेलाल यादव यांनी १३ मे रोजी रॉकेल प्राशन केले होते. त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले. तेथून त्यांना लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. उपचारादरम्यान १८ मेच्या रात्री ८ च्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अमित रामलाल यादव (वय ३२) यांनी दिलेल्या सूचनेवरून आधी एमआयडीसी आणि नंतर प्रतापनगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.