कवी लोकनाथ यशवंत यांच्या कविता शिवाजी विद्यापीठात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 12:21 IST2018-08-01T12:20:52+5:302018-08-01T12:21:52+5:30

बाकी सर्व ठीक आहे, या लोकनाथ यशवंत यांच्या नव्या कवितासंग्रहातील १६ कविता शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे बी.ए. प्रथम वर्ष अभ्यासण्याकरिता पाठ्याक्रमात अंतर्भूत करण्यात आल्या आहेत.

Poet Loknath Yashwant's poetry at Shivaji University | कवी लोकनाथ यशवंत यांच्या कविता शिवाजी विद्यापीठात

कवी लोकनाथ यशवंत यांच्या कविता शिवाजी विद्यापीठात

ठळक मुद्देबाकी सर्व ठीक आहे या कवितासंग्रहाचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बाकी सर्व ठीक आहे, या लोकनाथ यशवंत यांच्या नव्या कवितासंग्रहातील १६ कविता शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे बी.ए. प्रथम वर्ष अभ्यासण्याकरिता पाठ्यक्रमात अंतर्भूत करण्यात आल्या आहेत. लोकनाथ यशवंत यांचे चारही कविता संग्रह महाराष्ट्रातील विविध विद्यापीठात अभ्यासासाठी यापूर्वीच घेतलेले आहेत. सरळ सोप्या नेमक्या शब्दात खूप मोठा आशय अल्पाक्षरी कवितेतून ते व्यक्त करतात. त्यामुळे त्यांची कविता ह्रदय आणि मेंदूवर एकाच वेळी प्रहार करते. रोजच्या जीवनातील अनुभवाचे कवितांचे विषय असल्याने त्यांची कविता परिणामकारक होते. याचमुळे त्यांच्या कवितेवर चित्रपट आणि नाटकेही झालेली आहेत.

 

 

 

 

 

Web Title: Poet Loknath Yashwant's poetry at Shivaji University