लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पांढरकवडा, जळगाव व धुळे दौऱ्यावर येणार आहेत. या महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान ते नागपुरात दिवसातून दोनदा येणार असले तरी त्यांचा येथील कालावधी हा केवळ १० मिनिटांचा असेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर ते दोनदा पोहोचतील. दरम्यान, पंतप्रधानांच्या दौऱ्याबाबत तयारीचा प्रशासनातर्फे बुधवारी आढावा घेण्यात आला.नियोजित कार्यक्रमानुसार पंतप्रधान मोदी शनिवारी सकाळी ९ वाजून ५५ मिनिटांनी वायुसेनेच्या विशेष विमानाने नागपुरात येतील. त्यानंतर ते १० वाजता वायुसेनेच्या हेलिकॉप्टरने यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे रवाना होतील. तेथे आयोजित समारंभात सहभागी झाल्यानंतर दुपारी १ वाजून ५ मिनिटांनी हेलिकॉप्टरनेच विमानतळावर परततील आणि पाच मिनिटांनी वायुसेनेच्या विशेष विमानाने जळगावकडे रवाना होतील.पंतप्रधानांच्या दौऱ्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने तयारीचा आढावा घेतला. यासंदर्भात अप्पर जिल्हाधिकारी प्रकाश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी सुरक्षा व्यवस्था, ‘प्रोटोकॉल’ अंतर्गत विविध विभागांकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागासोबतच पोलीस, वायुसेनेचे विंग कमांडर, विमानतळ प्रमुख, इंडियन एअरलाईन्स, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा सर्जन, अन्न व औषध प्रशासन विभागाचे प्रतिनिधी बैठकीत सहभागी झाले होते.
पंतप्रधान नागपुरात १० मिनिटेच थांबणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 21:30 IST
शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पांढरकवडा, जळगाव व धुळे दौऱ्यावर येणार आहेत. या महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान ते नागपुरात दिवसातून दोनदा येणार असले तरी त्यांचा येथील कालावधी हा केवळ १० मिनिटांचा असेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर ते दोनदा पोहोचतील. दरम्यान, पंतप्रधानांच्या दौऱ्याबाबत तयारीचा प्रशासनातर्फे बुधवारी आढावा घेण्यात आला.
पंतप्रधान नागपुरात १० मिनिटेच थांबणार
ठळक मुद्देशनिवारी दोनदा विमानतळावर येणार : प्रशासनाने घेतला तयारीचा आढावा