पंतप्रधान मोदी रविवारी दोन वेळा नागपूर विमानतळावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 21:07 IST2018-11-17T21:05:49+5:302018-11-17T21:07:50+5:30
मध्य प्रदेशात सुरु असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १८ नोव्हेंबर रोजी नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन वेळा येणार आहेत.

पंतप्रधान मोदी रविवारी दोन वेळा नागपूर विमानतळावर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मध्य प्रदेशात सुरु असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १८ नोव्हेंबर रोजी नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन वेळा येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार आणि जिल्हाधिकारी अश्विन मुदगल हे विमानतळावर पंतप्रधानांचे स्वागत करतील. पंतप्रधनांच्या नियोजित कार्यक्रमानुसार ते रविवारी दुपारी २.२६ वाजता नगपूरच्या विमानतळावर पोहोचतील. २.३० वाजता ते हेलिकॉप्टर छिंदवाड्यासाठी रवाना होतील. सायंकाळी ५.०५ वाजता हेलिकॉप्टरने छिंदवाड्यावरून नागपूरच्या विमानतळावर येतील आणि ५.१० वाजता विमानाने इंदोरसाठी रवाना होतील.