शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचा युक्रेनवर भयंकर हल्ला! ४० क्षेपणास्त्रे, ४०० ड्रोन हल्ल्यात चार ठार, २० जण जखमी
2
अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उभारणीत ४५ किलो शुद्ध सोन्याचा वापर; किंमत सुमारे ५० कोटी
3
मणिपूरमध्ये बंदी घातलेल्या संघटनांच्या आठ दहशतवाद्यांना अटक; शस्त्रे, दारूगोळा जप्त
4
बँकांना २.५ लाख कोटींची संजीवनी; कर्जांची सोय; अर्थव्यवस्थेत तरलता आणण्यासाठी निर्णय
5
पायलटचा विमान उडवण्यास नकार; ४५ मिनिटे हायव्हॉल्टेज ड्रामा, एकनाथ शिंदे ताटकळले, मग...
6
भारतातील पाक गुप्तहेरांचा मास्टरमाईंड कोण?; पंजाबमधून अटक केलेल्या जसबीरचा शॉकिंग खुलासा
7
'इलॉन मस्क यांचं डोकं फिरलंय, मला नाही बोलायचं', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरसले
8
मोहम्मद युनूस यांची मोठी घोषणा, अखेर तारीख ठरली; बांगलादेशात कधी होणार निवडणूक? 
9
आधी चूक केली अन् आता घुमजाव...POK गमावण्याची धडकी मनात बसली; पाकिस्तान सरकारचा खुलासा
10
मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं विधान; देवेंद्र फडणवीसांनी ३ शब्दातच भाष्य केले
11
गाझात पारले-जीचा ६० रुपयांचा बिस्कीट पुडा २३५० ला; बापाने काळजाच्या तुकड्याला आणून दिला...
12
धावत्या ट्रेनमध्ये दरोडेखोराशी झटापट, पत्नीचं पर्स वाचवण्याच्या प्रयत्नात मुंबईतील डॉक्टरनं हात गमावला!
13
जी ७ शिखर संमेलनाचं भारताला निमंत्रण; कॅनडाच्या पंतप्रधानांचा नरेंद्र मोदींना फोन
14
मोठा धक्का! ओला इलेक्ट्रीकमध्ये ह्युंदाई, कियाने २५०० कोटी गुंतविलेले; वैतागून सर्व शेअर ७०० कोटींना विकले... 
15
मशीन गन, बुलेटप्रूफ जॅकेट अन्...काश्मीरला जाणाऱ्या 'वंदे भारत' एक्सप्रेसमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था
16
KL राहुलची कडक बॅटिंग, पण Chris Woakes समोर यशस्वीसह करुण नायरनं टाकली नांगी
17
"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा
18
'माझं तर डिमोशन झालं...!'; वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात ओमर अब्दुल्लांनी संधी साधली, केली मोठी मागणी
19
आधी अंगावर धाऊन गेली, मग कॉलर पकडून...; लोकलमध्ये महिलेकडून दिव्यांग प्रवाशाला मारहाण
20
Pooja Bagul: धुळ्याच्या पूजाला संपविण्यासाठी मांत्रिकाला प्रेयसी प्रज्ञाने दिले होते ५००००, तर कपिलने पाच लाख

प्लंबरला आता 'वॉटर इंजिनियर' म्हणायचं ! रोजगार मंत्रालयाचा विचार

By आनंद डेकाटे | Updated: June 5, 2025 16:41 IST

Nagpur : श्रमाचा सन्मान होण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र तसेच देशात रोजगाराची कमी नाही. मात्र, महाराष्ट्रात विद्यार्थ्यांना पसंतीचा रोजगार मिळत नाही. कौशल्य अभाव असल्याने पीछेहाट होते. श्रमाचा सन्मान होण्याची गरज आहे. त्यामुळेच नळ कारागिराला (प्लंबर) 'वॉटर इंजिनियर'चे नाव देण्याचा शासनाचा विचार असल्याचे कौशल्य, रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी येथे सांगितले.

विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा रोजगार व प्रशिक्षण विभाग, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि मॉडेल करिअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने महाराज बाग चौक स्थित विद्यापीठाच्या छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय परिसरातील दीक्षांत सभागृहात गुरूवारी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. रोजगार मेळाव्याला प्रभारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे, प्र कुलगुरू डॉ. सुभाष कोंडावार, डॉ. समय बनसोड, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नागपूरचे उपायुक्त प्रकाश देशमाने, सहआयुक्त सुनंदा बजाज, रोजगार व प्रशिक्षण अधिकारी डॉ. भूषण महाजन उपस्थित होते. कोणतेही काम छोटे अथवा मोठे असत नाही. प्रत्येक कामाला, कष्टाला सारखेच मूल्य असते. आपणास देण्यात आलेले कोणतेही काम श्रेष्ठपणे करण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांना कौशल्य युक्त केले तर यांच्यामधून मोठे उद्योजक तयार होतील आणि भारत विकसित होईल असे लोढा म्हणाले.

१९ कंपन्या तसेच ३२३ उमेदवाररोजगार मेळाव्याकरिता १९ कंपन्या तसेच ३२३ उमेदवार उपस्थित होते. यात ॲक्सिस बँक, इंडोरामा, टाटा तनिष्क, लाईट हाऊस सिस्टीम, निको अलाॅय, करण कोठारी ज्वेलर्स, स्मार्ट हायजीया प्रायव्हेट लिमिटेड नागपूर, द युनिव्हर्सल ग्रुप असोसिएट नागपूर, मंशा टूर्स प्रायव्हेट लिमिटेड, वैभव इंटरप्राईजेस नागपूर, टाटा स्ट्राईव्ह एक्सटेन्शन सेंटर वाडी नागपूर, ईराॅस मेटल वर्क्स प्रायव्हेट लिमिटेड, महाचाय प्रायव्हेट लिमिटेड नागपूर, एलआयसी ऑफ इंडिया, टाइम प्रो इव्हेंट अँड एज्युटेक प्रायव्हेट लिमिटेड यासह विविध कंपन्या या मेळाव्यामध्ये सहभागी झाल्या होत्या. 

टॅग्स :nagpurनागपूरUnemploymentबेरोजगारी