किरणापूर-काचूरवाही पांदण रस्त्याची दुर्दशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:19 IST2021-01-13T04:19:20+5:302021-01-13T04:19:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रामटेक : काचूरवाही-किरणापूर पांदण रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली आहे. यामुळे शेतमाल व शेतीपयाेगी साहित्यांची ने-आण ...

किरणापूर-काचूरवाही पांदण रस्त्याची दुर्दशा
लोकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : काचूरवाही-किरणापूर पांदण रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली आहे. यामुळे शेतमाल व शेतीपयाेगी साहित्यांची ने-आण करताना शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे हा पांदण रस्ता केव्हा पूर्ण हाेणार, असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत.
परिसरातील अतिशय महत्त्वाचा हा रस्ता किरणापूरसह इतर गावांना जोडला जातो. या मार्गावर किरणापूर, काचूरवाही, चोखाडा, वडेगाव येथील शेतकऱ्यांच्या शेती आहे. त्यामुळे या रस्त्याने बैलगाडी, ट्रॅक्टर, शेतीपयोगी साहित्य तसेच शेतमालाची वाहतूक करण्यासाठी शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते. विशेष म्हणजे, या पांदण रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. परंतु अद्यापही काम सुरू झाले नाही. त्यामुळे संबंधित कंत्राटदाराने तातडीने कामाला सुरुवात करून रस्ता वाहतुकीयाेग्य करावा, अशी मागणी नगरधन-भंडारबाेडी जिल्हा परिषद सर्कलचे सदस्य दुधराम सव्वालाखे यांच्यासह किरणापूर, काचूरवाही येथील शेतकऱ्यांनी केली आहे.