फरार वकील उकेची माहिती द्या

By Admin | Updated: June 16, 2017 01:56 IST2017-06-16T01:56:47+5:302017-06-16T01:56:47+5:30

उच्च न्यायालयाने फटकारल्यामुळे खडबडून जागे झालेल्या पोलिसांनी फरार वकील सतीश महादेवराव उके

Please inform the absconding lawyer | फरार वकील उकेची माहिती द्या

फरार वकील उकेची माहिती द्या

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उच्च न्यायालयाने फटकारल्यामुळे खडबडून जागे झालेल्या पोलिसांनी फरार वकील सतीश महादेवराव उके याचा शोध घेण्यासाठी जनतेला आवाहन केले आहे.
उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अवमान याचिका (०२/ २०१७) प्रकरणात सतीश महादेवराव उके ( वय अंदाजे ३६ वर्षे, रा. पार्वतीनगर, रामेश्वरी, अजनी) याला २० जून २०१७ ला कोर्टात हजर राहणे बाबतचा जमानती वॉरंट /आदेश काढला होता. त्याचप्रमाणे उच्च न्यायालय खंडपीठ, नागपूर येथील अवमान याचिका (क्र. ०७/२०१६) प्रकरणात सतीश उकेला दोन महिने कारावास आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. त्याबाबतचा न्यायालयाने निर्गमित केलेला पकड वॉरंट याप्रमाणे जमानती आणि अटक वॉरंट बजावण्याची जबाबदारी अजनी पोलिसांवर होती. पोलिसांनी प्रदीर्घ कालावधी होऊनही उकेचा शोध घेण्यात यश न मिळवल्याने उच्च न्यायालयाने पोलिसांना फटकारले आहे.

Web Title: Please inform the absconding lawyer