शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा! प्रकाश गजभिये : केंद्र्रीय कृषिमंत्री
By Admin | Updated: June 5, 2017 01:59 IST2017-06-05T01:59:38+5:302017-06-05T01:59:38+5:30
भाजपाने महाराष्ट्रातील जनतेला निवडणुकीच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांची कर्जमाफी करून त्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले, ...

शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा! प्रकाश गजभिये : केंद्र्रीय कृषिमंत्री
राधा मोहन सिंह यांना निवेदन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भाजपाने महाराष्ट्रातील जनतेला निवडणुकीच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांची कर्जमाफी करून त्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले, या आश्वासनाला तब्बल तीन वर्षे पूर्ण होऊन सुध्दा कर्जमाफी दिली नाही, याची आठवण करून देत शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्यास राज्य सरकारला केंद्र सरकारने आर्थिक मदत करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आमदार प्रकाश गजभिये यांनी केली असून ेकेंद्रीय कृषिमंत्री राधा मोहन सिंह यांना यासबंधीच्या मागणीचे निवेदन सादर केले.
देशाच्या इतिहासात प्रथमच महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांनी संपावर जाऊन अन्नधान्य, भाजीपाला, दूध आदीं वस्तू रस्त्यावर फेकून भाजप सरकारचा निषेध केला, आजही हे आंदोलन सुरू असल्याचे केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या लक्षात आणून दिले.
आपण केंद्र सरकारकडून महाराष्ट्र राज्याला आर्थिक मदत देऊन भाजपने निवडणुकीत शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन पूर्ण करावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
यावेळी केंद्र्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी राज्याची कर्जमाफी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच करतील, असे सांगितले. केंद्रीय कृषिमंत्र्यांनी हे शब्द उच्चारून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत केंद्र सरकारची उदासीनता दाखविली व महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचा अपमान केला, असा आरोपही आ. प्रकाश गजभिये यांनी केला.