फुग्याशी खेळणे बेतले चिमुकल्याच्या जीवावर; घशात अडकला तुकडा आणि घडले अघटित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2021 22:39 IST2021-11-02T22:38:36+5:302021-11-02T22:39:04+5:30
Nagpur News तोंडातील फुगा घशात फसल्याने एका ६ वर्षीय चिमुकल्याचा करुण अंत झाला. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी दुपारी ४.३०च्या सुमारास ही घटना घडली.

फुग्याशी खेळणे बेतले चिमुकल्याच्या जीवावर; घशात अडकला तुकडा आणि घडले अघटित
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तोंडातील फुगा घशात फसल्याने एका ६ वर्षीय चिमुकल्याचा करुण अंत झाला. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी दुपारी ४.३०च्या सुमारास ही घटना घडली.
विजय रामकुमार पटेल असे या चिमुकल्याचे नाव आहे. नंदनवनमधील स्वराज विहार कॉलनीत पटेल कुटुंबीय भाड्याच्या खोलीत राहतात. सोमवारी दुपारी ४.३०च्या सुमारास तो तोंडात फुगा टाकून खेळत होता. बोलता-बोलता फुगा त्याच्या घशात फसला. चिमुकल्या विजयची प्रकृती बिघडल्यानंतर घरच्यांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यांनी त्याला उपचारासाठी मेडिकलमध्ये नेले. तेथे डॉक्टरांनी विजयला मृत घोषित केले. या घटनेची वार्ता परिसरात कळताच तीव्र शोककळा पसरली. ऐन दिवाळी सणात घरातील दिवा मालवल्याने पटेल कुटुंबीयांना जबर मानसिक धक्का बसला असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. नंदनवन पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.
----