लग्नात रात्री ९ पर्यंतच बॅन्ड वाजवा  : बॅन्ड पथकासाठी दिशानिर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2020 08:12 PM2020-11-10T20:12:26+5:302020-11-10T20:14:21+5:30

Band parties dirction, Nagpur news सामाजिक अंतर राखून बॅन्ड वाजविणे बंधनकारक असून, रात्री ९ पर्यंतच बॅन्ड वाजविण्याची मुभा असल्याबाबतचे आदेश मनपा आयुक्त राधकृष्ण्न बी. यांनी जारी केले आहे.

Play the band till 9 pm at the wedding: Guidelines for the band | लग्नात रात्री ९ पर्यंतच बॅन्ड वाजवा  : बॅन्ड पथकासाठी दिशानिर्देश

लग्नात रात्री ९ पर्यंतच बॅन्ड वाजवा  : बॅन्ड पथकासाठी दिशानिर्देश

Next
ठळक मुद्देमनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : लग्नसमारंभ वा कार्यक्रमात सुरक्षेच्या दृष्टीने बॅन्ड पथकासाठी मनपातर्फे दिशानिर्देश जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार बॅन्ड पथकामध्ये जास्तीतजास्त २० हून अधिक व्यक्तींचा समावेश नसावा. लग्नसमारंभात ५० व्यक्तींना परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये बॅन्ड पथकातील सदस्यांची संख्या गृहित धरण्यात येईल. सामाजिक अंतर राखून बॅन्ड वाजविणे बंधनकारक असून, रात्री ९ पर्यंतच बॅन्ड वाजविण्याची मुभा असल्याबाबतचे आदेश मनपा आयुक्त राधकृष्ण्न बी. यांनी जारी केले आहे.

बॅन्ड पथकाच्या मालकाने पथकातील सर्व सदस्यांचे थर्मल स्कॅनिंग, सर्व साहित्याचे नियमित निर्जंतुकीकरण करून घेणे बंधनकारक आहे. पथकातील सर्वांनी मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक राहील. पथकातील एखाद्या व्यक्तीस ताप किंवा इतर कोविडसदृश लक्षणे आढळल्यास त्याचा पथकात समावेश करू नये. कोविड-१९अंतर्गत शासन व मनपा आयुक्तांद्वारे वेळोवेळी दिलेल्या निर्देशाचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे.

Web Title: Play the band till 9 pm at the wedding: Guidelines for the band

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.