पहिल्यांदाच प्लाझ्मा दान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:27 IST2020-12-15T04:27:44+5:302020-12-15T04:27:44+5:30
उमरेड : कोरोनाच्या विपरीत परिस्थितीत प्लाझ्मा आणि रक्तसाठा अपुरा पडत असल्याने गंभीर समस्यांचा सामना करावा लागत आहे. ही बाब ...

पहिल्यांदाच प्लाझ्मा दान शिबिर
उमरेड : कोरोनाच्या विपरीत परिस्थितीत प्लाझ्मा आणि रक्तसाठा अपुरा पडत असल्याने गंभीर समस्यांचा सामना करावा लागत आहे. ही बाब लक्षात येताच उमरेडमधील विविध संघटनांनी शहरात पहील्यांदाच प्लाझ्मा दान शिबिराचे आयोजन केले. यामध्ये ११ जणांनी प्लाझ्मा दान करीत सामाजिकता जोपासली. १९ दात्यांनी रक्तदान करीत प्रतिसाद दिला. यामध्ये पाच महिलांचा समावेश आहे.
भरारी, जेसीआय, संताजी फाऊंडेशन, माधव बहुद्देशीय, फोटोग्राफर असोसिएशन, राजाधिराज ढोलताशा पथक, ओम साई स्पोर्टिंग क्लब, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा, हलबा युथ फाऊंडेशन, केकेपी युवा मंडळ आदी स्थानिक संघटना एकवटल्या. आ. राजू पारवे, संजय मेश्राम, अजय कोवे, दिनेश पटेल, संजय ठाकरे, मनोज ठाकरे, अर्जुन गिरडे, विलास मुंडले, सुरज इटनकर, जगदीश वैद्य, विशाल देशमुख, मंगेश गिरडकर, जितू गिरडकर, कोहिनूर वाघमारे, अमित लाडेकर आदींची उपस्थिती होती.
प्लाझ्मा संकलनाचे कार्य लाईफलाईन रक्तपेढीच्या चमूने केले. प्रा. बळीराम भांगे, अॅड. प्रमोद रघुते, शुभम महाकाळकर, ईशान चौधरी, रूपेश बारापात्रे, रितेश राऊत, रोशनी महाकाळकर, प्रणाली शिंदेकर आदींनी सहकार्य केले.
यांनी केला प्लाझ्मा दान
प्रदीप निमजे, विक्की सहजरामानी, विपीन भांडारकर, कृष्णाजी पाठे, अरविंद झाडे, आशिष डहाके, मुकूल लुले, स्वप्निल ब्रम्हे, अनिरुद्ध चचाने, रवी सहजरामानी, सचिन दांडेकर या ११ जणांनी प्लाझ्मा दान केले.