कडुनिंबाच्या ५० राेपट्यांची लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:10 IST2021-06-09T04:10:42+5:302021-06-09T04:10:42+5:30
जलालखेडा : देवग्राम (थुगावदेव, ता. नरखेड) येथील जीवन विकास महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा याेजनेच्यावतीने पर्यावरण दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले ...

कडुनिंबाच्या ५० राेपट्यांची लागवड
जलालखेडा : देवग्राम (थुगावदेव, ता. नरखेड) येथील जीवन विकास महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा याेजनेच्यावतीने पर्यावरण दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. यावेळी कडुनिंबाच्या ३० राेपट्यांसह इतर झाडांची लागवड करण्यात आली.
याप्रसंगी प्रा. डॉ. देवेंद्र भोंगाडे, विलास भाेंगाडे, प्रा. डॉ. याेगेश सराेदे, प्रा. डॉ. मंगेश आचार्य, प्रा. डाॅ. दीपक अरजपुरे, प्रा. डॉ. राजू श्रीरामे, प्रा. डॉ. प्रवीण घारपुरे, प्रा. डाॅ. राजकिशोर गुप्ता, राजेश इंगळे, प्रा. देवेंद्र वासाडे, प्रा. धनराज पांडव, प्रा. दिनेश पांगूळ, प्रा. खिजर पठाण, रवी चाैधरी, अनिल माेरे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित हाेते. अतिथींनी पर्यावरणाच्या समताेलातील झाडांचे महत्त्व, त्यांचे संवर्धन, त्यांचे मानवी जीवनातील महत्त्व यासह अन्य बाबींवर मार्गदर्शन केले. शिवाय, लावलेल्या झाडांचे संगाेपन करण्याची जबाबदारी स्वीकारत या पावसाळ्यात २०० राेपट्यांची लागवड करण्याचा निधार्रही केला.
===Photopath===
060621\2123img_20210606_130621.jpg
===Caption===
फोटो ओळी. महाविद्यालय परिसरात वृक्षा रोपण करताना प्राचार्य डॉ. देवेंद्र भोंगाडे व कर्मचारी.