उड्डाण भरताच विमान रडारवर
By Admin | Updated: May 11, 2014 01:24 IST2014-05-11T01:24:35+5:302014-05-11T01:24:35+5:30
उड्डाण भरताच आता विमान रडारवर दिसतील. तसेच त्यांचे रेकॉर्ड, जीपीएस सर्व्हरसुद्धा उपलब्ध होतील. यापूर्वी विमानांमध्ये असलेल्या जीपीएस बेस्ट

उड्डाण भरताच विमान रडारवर
नागपूर : उड्डाण भरताच आता विमान रडारवर दिसतील. तसेच त्यांचे रेकॉर्ड, जीपीएस सर्व्हरसुद्धा उपलब्ध होतील. यापूर्वी विमानांमध्ये असलेल्या जीपीएस बेस्ट सेटिंगचे कंट्रोल पायलटच्या हातात होते. परंतु आता या सेटिंगला पायलटच्या नियंत्रणातून मुक्त करीत आॅटोमॅटिक करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विमानाच्या उड्डाणादरम्यान जीपीएस सुरू असल्यास विमानांच्या लोकेशनची माहिती सेंट्रलाईज सिस्टिमला मिळते. विमान क्षेत्रातील अधिकारिक सूत्रानुसार जगातील असे २५ सॅटेलाईट आहेत, जे उडणार्या विमानांच्या रुटवरील रेकॉर्डिंमध्ये मदत करतात. याचा सर्व डेटा युएस स्पेस अॅडमिनिस्ट्रेशनजवळ असतो. जीपीएस रिसिव्हरचा डेटा रेकॉर्ड करण्यासाठी विमानांमधील ट्रॅकिंग सिस्टिम आॅपरेट करणे आवश्यक असते. डायरेक्टर जनरल आॅफ सिव्हिल एव्हीएशन (डीजीसीए) ने उड्डाणादरम्यान विमानांवर नजर ठेवण्यासाठी जीपीएस बेस्ट सेटिंगला आॅटोमॅटिक करण्याचे निर्देश एअरलाईन्सला दिले आहेत. कोणत्याही विमानांच्या उड्डाणादरम्यान विमान अपघातग्रस्त झाले किंवा गायब झाल्यास त्याचा शोध घेणे किंवा मदतीसाठीचे अभियान राबवण्यास मदत मिळेल. मलेशियन विमान एएच-३७० हे ८ मार्च रोजी अचानय बेपत्ता झाले. तेव्हापासून त्याची कुठलीही माहिती मिळाली नाही. त्या विमानामध्ये रियल ट्रॅकिंगची सुविधा नव्हती. डीजीसीएतर्फे ५ मे रोजी जारी करण्यात आलेल्या सेफ्टी सर्कुलर संख्या -४ मध्ये सर्व एअरलाईन्सला उड्डाणादरम्यान विमानांमधील कम्युनिकेशन एड्रेसिंग अॅण्ड रिपोर्टिंग सिस्टम (एसीएआरएस) आॅटोमेटिक डिपेंडेंट सर्व्हिलांस ब्रॉडकास्टिंग (एडीएसबी) प्रणालीचा उपयोग करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.(प्रतिनिधी)