शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

नागपुरातील गांजा तस्कराकडून पिस्तुलही जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 00:22 IST

छत्तीसगडमधून गांजाची मोठी खेप घेऊन नागपुरात येताना पोलिसांनी जेरबंद केलेल्या तस्करांपैकी एकाच्या घरातून पोलिसांनी पिस्तुल तसेच चार जिवंत काडतूस जप्त केले. राजेंद्र ऊर्फ लड्डू किराड (वय ३२, रा. सतनामीनगर) असे पिस्तुल जप्त करण्यात आलेल्या तस्कराचे नाव आहे.

ठळक मुद्देकुख्यात किराडच्या घराची पोलिसांकडून झडती : जिवंत काडतूसही आढळले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : छत्तीसगडमधून गांजाची मोठी खेप घेऊन नागपुरात येताना पोलिसांनी जेरबंद केलेल्या तस्करांपैकी एकाच्या घरातून पोलिसांनी पिस्तुल तसेच चार जिवंत काडतूस जप्त केले. राजेंद्र ऊर्फ लड्डू किराड (वय ३२, रा. सतनामीनगर) असे पिस्तुल जप्त करण्यात आलेल्या तस्कराचे नाव आहे.गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने रविवारी आणि सोमवारी सलग धाडसी कारवाई करीत गांजा तस्कर राजेंद्र ऊर्फ लड्डू किराड, नितीन कृष्णाजी मोहाडीकर (वय ३५, रा. भवानीनगर न्यू शारदा चौक, कळमना), स्वप्निल सुरेश तोडसाम (वय ३०, रा. आराधनानगर खरबी), महेंद्र केशवराव वाडनकर (वय ३२, रा. सतनामीनगर, लकडगंज) आणि अनिल विष्णुप्रसाद विश्वकर्मा (वय १९, रा. भवानीनगर, कळमना) तसेच शेख सादिक शेख बाबा (वय ३३), शेख अरमान शेख उमर (वय २१) आणि शेख राजिक ऊर्फ गोलू शेख बाबा (वय २२) या आठ तस्करांना जेरबंद केले. त्यांच्याकडून एकूण ४०० किलो गांजा, पाच वाहने तसेच आठ मोबाईलसह ७२ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. सोमवारी रात्री पोलिसांनी लड्डू किराड याच्या घराची झडती घेतली असता त्याच्याकडे एक पिस्तुल आणि चार जिवंत काडतूस आढळले. पोलिसांनी ते जप्त केले. आरोपींना न्यायालयात हजर करून पोलिसांनी सात दिवसांची कस्टडी मिळवली.पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, सहआयुक्त रवींद्र कदम, अतिरिक्त आयुक्त बी. जी. गायकर, गुन्हे शाखेचे उपायुक्त संभाजी कदम तसेच सहायक आयुक्त संजीव कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली एनडीपीएस सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र निकम, सहायक निरीक्षक दिलीप चंदन, स्वप्निल वाघ, एएसआय अर्जुन सिंग, विठोबा काळे, हवालदार दत्ता बागुल, विनोद मेश्राम, नायक तुलसी शुक्ला, सतीश पाटील, शिपाई नितीन साळुंखे, नरेश शिंगणे, कुंदा जांभुळकर, रुबिना शेख त्याचप्रमाणे सायबर सेलचे सूरज भोंगाडे, सुहास शिंगणे, आशिष पाटील आणि नितीन वानखेडे आदींनी ही कामगिरी बजावली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNagpur Policeनागपूर पोलीस