नागपुरात पिस्तूल, जिवंत काडतूस जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 23:03 IST2019-08-01T23:02:22+5:302019-08-01T23:03:23+5:30

जरीपटका पोलिसांनी दोघांना अटक करून त्यांच्याजवळून एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतूस जप्त केले.

Pistols, live cartridges seized in Nagpur | नागपुरात पिस्तूल, जिवंत काडतूस जप्त

नागपुरात पिस्तूल, जिवंत काडतूस जप्त

ठळक मुद्देदोघांना अटक : जरीपटका पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जरीपटका पोलिसांनी दोघांना अटक करून त्यांच्याजवळून एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतूस जप्त केले. बुधवारी दुपारी मेकोसाबाग लेंडी मैदानातील वाचनालयाजवळ पोलिसांनी ही कारवाई कली. शिनू मृगेसन शेट्टीयार (वय २१, रा. संत लहानुजीनगर, जरीपटका) आणि राजकुमार भगवानसिंग ठाकूर (वय ४०, रा. बडकुवा, जि. सागर,मध्य प्रदेश) अशी आरोपींची नावे आहेत.
कॉलेज बॅग घेऊन स्प्लेंडरवर एक तरुण वाचनालयाजवळ बसला आहे, त्याच्याजवळ पिस्तूल आहे, अशी माहिती बुधवारी दुपारी जरीपटका पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी तेथे जाऊन आरोपी शिनूला अटक केली. त्याच्याकडे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतूस आढळले. ते कुणाकडून घेतले, याची चौकशी केली असता शिनूने मध्य प्रदेशातील ठाकूरचे नाव सांगितले. त्यावरून पोलिसांनी ठाकूरलाही ताब्यात घेतले. या दोघांना शस्त्रकायद्यानुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. परिमंडळ पाचचे उपायुक्त निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली जरीपटक्याचे ठाणेदार पराग पोटे, उपनिरीक्षक वसंत पवार, हवालदार गजेंद्रसिंग ठाकूर, नायक गणेश बरडे, आसिफ शेख, आनंद मरस्कोल्हे, रवी अहिर, गणेश गुप्ता, मुकेश यादव, पवन यादव आणि हरीश इंगळे यांनी ही कामगिरी बजावली.

Web Title: Pistols, live cartridges seized in Nagpur