शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
4
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
5
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
6
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
7
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
8
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
9
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
10
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
11
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
12
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
13
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
14
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
15
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
16
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
17
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
18
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
19
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
20
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

कुख्यात गुंडाकडून पिस्तूल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : गिट्टीखदानमधील कुख्यात गुंड आबिद अजिमउल्ला शेख (वय २९, रा. पटेलनगर) याच्याकडून पोलिसांनी मंगळवारी दुपारी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : गिट्टीखदानमधील कुख्यात गुंड आबिद अजिमउल्ला शेख (वय २९, रा. पटेलनगर) याच्याकडून पोलिसांनी मंगळवारी दुपारी एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली.

आबिद शेख सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध डझनभर गुन्हे दाखल आहेत. त्याच्याकडे पिस्तूल असून तो बोरगावमधील शिंगणेच्या शेताजवळ संशयास्पद अवस्थेत वावरत असल्याची माहिती गिट्टीखदान पोलिसांना मिळाली. त्यावरून ठाणेदार गजानन कल्याणकर यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक दत्ता पेंडकर, डी. सी. पटले, हवालदार युवराज ढोले, इमरान शेख, शशांक आटे, संतोष शेंद्रे, आशिष बावणकर आदींच्या पथकाने मंगळवारी दुपारी १२.४५ च्या सुमारास तिकडे धाव घेतली. आबिद हा चिंचेच्या झाडाखाली संशयास्पद अवस्थेत दिसला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याची झडती घेतली असता पोलिसांना एक पिस्तूल आढळले. त्यावर मेड इन चायना असे लिहून आहे. सोबतच दोन जिवंत काडतुसे त्याच्याकडे आढळली. पोलिसांनी ती जप्त केली. प्राथमिक चाैकशीत आरोपीने हे पिस्तूल मध्यप्रदेशातून विकत घेतल्याचे सांगितले. प्रतिस्पर्धी गुंडांकडून धोका होण्याची भीती असल्याने आपण स्वत:जवळ हे पिस्तूल बाळगत असल्याचे आबिदने पोलिसांना सांगितले आहे.

---

‘गेम’ची तयारी?

आरोपी आबिद हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे. काही वर्षांपूर्वी प्रतिस्पर्धी गुंडांनी त्याच्यासह त्याचा साथीदार सारंग मदनेवर हल्ला चढवला होता. त्यात सारंग ठार झाला होता तर आबिद बचावला. तो या प्रकरणातील साक्षीदारही आहे. त्यामुळे त्याला सतत जीवाची भीती सतावते. या भीतीमुळेच तो कुणाचा गेम करण्याची तयारी करीत असावा, असाही संशय आहे. पीएसआय पेंडकर आणि त्यांच्या पथकातील सहकारी आबिदची कसून चौकशी करीत आहेत.

----