शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 21:02 IST

मी बोललो, मी जॉर्ज फर्नांडीस यांना बघितलंय, मी अटलजींना बघितलंय, बाळासाहेब देवरस, भाऊराव देवरसांना बघितलं, दत्तोपंत ठेंगडींना बघितलं, अशा अनेक लोकांना बघितलं. ज्यांनी या संघटनेला आपलं आयुष्य दिलं. त्यांना काहीच मिळालं नाही. त्यामुळे जी भूमिका मिळेल ते काम करायचे...

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना, 2029 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीतील त्यांच्या भूमिकेसंदर्भात विचारले असता, "गेल्या 11 वर्षांत आपण जे काही बघितले, ती केवळ एक न्यूज रील होती आणि खरा पिक्चर सुरू होणे अद्याप बाकी आहे," असे गडकरी यांनी म्हटले आहे. ते शनिवारी केंद्र सरकारच्या ११ व्या वर्षपुर्तीनिमित्त उदय निरगुडकर यांनी घेतलेल्या एका प्रकट मुलाखतीत नागपूर येथे बोलत होते.

"पक्ष जी जबाबदारी देईन ती पार पाडेन" -पुढे बोलताना भाजपचे माजी केंद्रीय अध्यक्ष तथा विद्यमान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, आमच्याकडे कार्यकर्त्याची जबाबदारी काय राहील आणि त्याने काय करावे? हे पक्ष ठरवतो. आणि विचाराल, तर मी एवढी वर्षे राजकारणात आहे, मी माझा बायोडाटाही कधी छापला नाही आणि मला न मागता... मी लोकांना सांगतो, पोस्टर लावू नका, बॅनर लावू नका, कटाऊट लावू नका. मी ४०-४५ वर्षांपसून राजकारणात माझ्या स्वागताला विमानतळावर कुत्राही येत नाही. आता कुत्रा यायला लागलाय कारण मी झेड प्लस असल्याने तो कुत्रा एक राऊंड मारून जातो.

मी बोललो, मी जॉर्ज फर्नांडीस यांना बघितलंय, मी अटलजींना बघितलंय, बाळासाहेब देवरस, भाऊराव देवरसांना बघितलं, दत्तोपंत ठेंगडींना बघितलं, अशा अनेक लोकांना बघितलं. ज्यांनी या संघटनेला आपलं आयुष्य दिलं. त्यांना काहीच मिळालं नाही. त्यामुळे जी भूमिका मिळेल ते काम करायचे.

विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याच्या दिशेने काम करणे माझी वैयक्तिक इश्चा -गडकरी पुढे म्हणाले, माझी स्वतःची आवड म्हणाल तर, विदर्भातील शेतकरी जे आत्महत्या करतात, त्या एकाही शेतकऱ्याने आत्महत्या करू नये, असा प्रकारचे काही काम करण्याचा मी प्रयत्न करतोय. मला गेल्या अनेक वर्षांत बरेच काही मिळाले आहे. मी तृप्त आहे. मी रस्त्यांपेक्षाही, शेती संदर्भात अधिक काम करतो, मी वेगवेगळ्या क्षेत्रात अधिक काम करतो."

 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीnagpurनागपूरBJPभाजपाPoliticsराजकारण