पिकअप्ची दुचाकीला धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:21 IST2021-01-13T04:21:06+5:302021-01-13T04:21:06+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क काेंढाळी : भरधाव पिकअप् वाहनाने दुचाकीला जाेरात धडक दिली. त्यात दुचाकीवर मागे बसलेल्या एकाचा घटनास्थळीच मृत्यू ...

पिकअप्ची दुचाकीला धडक
लाेकमत न्यूज नेटवर्क
काेंढाळी : भरधाव पिकअप् वाहनाने दुचाकीला जाेरात धडक दिली. त्यात दुचाकीवर मागे बसलेल्या एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर दुचाकीचालक गंभीर जखमी झाला. अपघाताची ही घटना काेंढाळी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील मसाळा टी-पाॅईंट परिसरात मंगळवारी दुपारी १ च्या सुमारास घडली.
संदीप चंपतराव काेहळे (वय २३, रा. गाैराळा, ता. हिंगणा) असे मृताचे नाव असून, नीतेश ईश्वर उईके (३०, रा. घुबडी, ता. काटाेल) असे जखमी दुचाकीचालकाचे नाव आहे. नीतेश व संदीप हे दाेघेही एमएच-४०/बीक्यू-२५४० क्रमांकाच्या दुचाकीने काेंढाळीकडून मसाळा गावाकडे जात हाेते. दरम्यान टी-पाॅईंट परिसरात नागपूरहून अमरावतीकडे जाणाऱ्या एमएच-२७/बीएक्स-४८६४ क्रमांकाच्या भरधाव पिकअप् वाहनाने त्यांच्या दुचाकीला जाेरदार धडक दिली. त्यात दुचाकीवर मागे बसलेल्या संदीपच्या डाेक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर दुचाकीचालक नीतेश हा गंभीररित्या जखमी झाला.
घटनेची माहिती मिळताच काेंढाळीचे ठाणेदार विश्वास पुल्लरवार पाेलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पाेहाेचले. पाेलिसांनी जखमीला काेंढाळी प्राथमिक आराेग्य केंद्रात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर जखमीला नागपूर मेडिकल रुग्णालयात हलविण्यात आले. याप्रकरणी काेंढाळी पाेलिसांनी आराेपी पिकअप् वाहनचालक सुनील तुकाराम पारवे (२७, रा. खारवा, जि. अमरावती) याच्याविरुद्ध गुन्हा नाेंदवून त्यास अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास काेंढाळी पाेलीस करीत आहेत.