डिप्रेशन दूर करण्याच्या बहाण्याने शारीरिक शोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 23:38 IST2021-03-30T23:37:27+5:302021-03-30T23:38:41+5:30
sexual exploitation, crime news डिप्रेशन दूर करण्याचा बनाव करत स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या युवतीचे नृत्य प्रशिक्षकाने दारू पाजून शारीरिक शोषण केले. ही घटना रविवारी दुपारची अजनी पोलीस ठाणे परिसरातील आहे.

डिप्रेशन दूर करण्याच्या बहाण्याने शारीरिक शोषण
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डिप्रेशन दूर करण्याचा बनाव करत स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या युवतीचे नृत्य प्रशिक्षकाने दारू पाजून शारीरिक शोषण केले. ही घटना रविवारी दुपारची अजनी पोलीस ठाणे परिसरातील आहे. आरोपी सोमवारी क्वाॅर्टर निवासी २५ वर्षीय रोमिओ गजानन गोडबोले हा आहे.
पीडिता २३ वर्षीय अभियंता वर्धा येथील रहिवासी आहे. ती स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. तीन वर्षापासून ती अजनी पोलीस ठाणे परिसरात भाड्याच्या घरात राहते. ती रोमियोच्या मित्राची प्रेयसी आहे. त्यामुळेच, तिची रोमियोसोबत ओळख आहे. रोमियो नृत्य प्रशिक्षक आहे. काही दिवसापूर्वी युवतीचे तिच्या प्रियकरासोबत ब्रेकअप झाल्याचे सांगितले जाते. यामुळे, ती गेल्या १५ दिवसांपासून डिप्रेशनमध्ये होती. ही संधी साधत रोमियोने तिच्याशी जवळीक साधली. तो तिला डिप्रेशनपासून दूर नेण्याचे प्रयत्न करत असल्याचा बनाव करत होता. पीडितेच्या तक्रारीनुसार रविवारी दुपारी २ वाजता रोमिओ तिच्या घरी आला. त्याच्याजवळ दारू होती. दारू पिल्याने डिप्रेशन कमी होईल, असे त्याने तिला सांगितले आणि तिला दारू पाजली. त्यानंतर जबरीने पीडितेशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. नशेत असल्याने पीडिता विरोध करू शकली नाही. शुद्धीवर आल्यानवर तिला या प्रकाराची जाणिव झाली. तिने अजनी ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी तात्काळ बलात्कार व ॲट्राॅसिटीचा गुन्हा दाखल करत रोमिओला अटक केली आहे.