शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

कैद्याच्या पत्नीवर शारीरिक अत्याचार, डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2023 21:24 IST

Nagpur News लग्नाचे आमिष दाखवून एका विवाहितेवर शारीरिक अत्याचार करणाऱ्या डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित महिला ही खुनाची शिक्षा भोगत असलेल्या कैद्याची पत्नी आहे.

नागपूर : सर्वसामान्यांकडून वैद्यकीय तज्ज्ञांकडे आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून पाहिले जाते, मात्र एका डॉक्टरने चक्क एका महिलेवर शारीरिक अत्याचार करीत हा समज मोडीत काढला आहे. लग्नाचे आमिष दाखवून एका विवाहितेवर शारीरिक अत्याचार करणाऱ्या डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे संबंधित महिला ही खुनाची शिक्षा भोगत असलेल्या कैद्याची पत्नी आहे. सदर पोलिस ठाण्याअंतर्गत ही घटना घडली.

डॉ. गौरव रमेश डोर्लीकर (वय ३५, गुरुदेव नगर, नंदनवन) असे आरोपी डॉक्टरचे नाव आहे. ३६ वर्षीय महिलेचे लग्न झाले असून, तिला मूलदेखील आहे. तिचा पती अनेक वर्षांपासून खुनाच्या आरोपात मध्यवर्ती कारागृहात आहे. एका नातेवाइकाच्या माध्यमातून ती क्युनेट बिझनेसमध्ये आली व तिची डॉ. गौरव डोर्लीकरसोबत ओळख झाली. त्याचेदेखील लग्न झाले आहे. डोर्लीकरने तिला आपल्या जाळ्यात ओढले व लग्नाचे आमिष दाखवीत तिला घटस्फोट फाईल करण्यास सांगितले. त्याने स्वत:देखील पत्नीसोबत काडीमोड घेऊन महिलेशी लग्न करण्याचे आश्वासन दिले. संबंधित महिलेने घटस्फोटासाठी अर्जदेखील दिला.

यानंतर त्याने तिला सदर पोलिस ठाण्याच्या हद्दीत काटोल मार्गावरील एका प्लॅटमध्ये तिला नेऊन तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. १० जानेवारी २०२२ पासून वर्षभर तो तिला तेथे घेऊन गेला व वारंवार तिच्यावर अत्याचार केला. महिलेने त्याला लग्नाबाबत विचारले असता त्याने तिला नकार दिला. मी कुठल्याही स्थितीत लग्न करणार नाही, असे त्याने तिला म्हटले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर महिलेने सदर पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी डॉ. डोर्लीकरविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार असून फोनदेखील स्वीच ऑफ आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

टॅग्स :Molestationविनयभंग