शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘लिव्ह इन’मधील प्रेयसीवर अत्याचार, तिच्या मृतक आईच्या नावावर घेतले कर्ज

By योगेश पांडे | Updated: November 6, 2023 18:01 IST

फसवणूक व अत्याचाराचा गुन्हा दाखल

नागपूर : ‘लिव्ह इन रिलेशनशीप’मध्ये राहणाऱ्या प्रेयसीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीने तिच्या आईच्या नावावर परस्पर कर्ज उचलल्याची बाब समोर आली आहे. पोलिसंनी आरोपीला अटक केली आहे. पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

प्रफुल्ल रामचंद्र बले (३५, पिरॅमिड सिटी, बेलतरोडी) असे आरोपीचे नाव आहे. २४ वर्षीय तरुणीशी त्याची कोरोनादरम्यान ओळख झाली होती. तिच्या आईला कोरोना झाला होता व त्यावेळी प्रफुल्लसोबत तिची ओळखी झाली. कोरोनामुळे तिच्या आईचा मृत्यू झाला. प्रफुल्लने तिला भावनिक आधार दिला व मैत्री केली. त्यानंतर त्यांच्यात जवळीक वाढत गेली व त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्याने तिला आपण लग्न करू असे आमिष दाखवत ‘लिव्ह इन’मध्ये राहण्यास भाग पाडले. १४ एप्रिल २०२१ पासून फेब्रुवारी २०२३ या कालावधीत त्याने तिच्यावर अनेकदा अत्याचार केले. या कालावधीत त्याने तिच्या आईचे आधार कार्ड व पॅनकार्ड वापरून वेगवेगळ्या लोन ॲपवरून दीड लाखांचे कर्ज घेतले.

काही महिन्यांनी बँकेतून कर्ज भरण्यासाठी नोटीस आली. त्यामुळे तिला आश्चर्य वाटले. मृत पावलेली आई कर्ज कशी घेऊ शकते, असा सवाल तिन बँक अधिकाऱ्यांना विचारला असता सर्व सत्य समोर आले. तिने त्याला कर्जाची रक्कम भरण्यास सांगितले. प्रफुल्लने तिला नकार दिला. तसेच त्याने लग्न करण्यासदेखील मनाई केली. अखेर तरुणीने पाचपावली पोलीस ठाणे गाठले व प्रफुल्लविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी त्याच्याविरोधात फसवणूक व अत्याचाराचा गुन्हा दाखल करत अटक केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंगSexual abuseलैंगिक शोषणfraudधोकेबाजीnagpurनागपूर