महिलेला वारंवार फोन करणे महागात पडले; तिने दिला विटांच्या तुकड्यांनी प्रसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2021 22:09 IST2021-10-26T22:08:37+5:302021-10-26T22:09:56+5:30
Nagpur News ओळखीच्या महिलेला वारंवार फोन करणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले. एका आरोपीने त्याच्यावर चाकू हल्ला केला, तर त्या महिलेने विटांचे तुकडे फेकून मारले. त्यात अश्विन भीमराव गणवीर (वय ३०) जखमी झाला.

महिलेला वारंवार फोन करणे महागात पडले; तिने दिला विटांच्या तुकड्यांनी प्रसाद
नागपूर : ओळखीच्या महिलेला वारंवार फोन करणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले. एका आरोपीने त्याच्यावर चाकू हल्ला केला, तर त्या महिलेने विटांचे तुकडे फेकून मारले. त्यात अश्विन भीमराव गणवीर (वय ३०) जखमी झाला.
अश्विन जरीपटक्यातील वरपाखड वस्तीत राहतो. वस्तीतीलच चांदनी (वय २५) हिला तो वारंवार फोन करत होता. त्याचे फोनोफ्रेण्ड करणे अनिकेत गायकवाडला आवडत नव्हते. त्यामुळे अनिकेतने सोमवारी दुपारी १२च्या सुमारास अश्विनला वस्तीतीलच एका प्रेसच्या दुकानाजवळ बोलाविले. सोबत चांदनीही होती. तू हिला वारंवार त्रास का देतो, असे सांगून अनिकेतने शिवीगाळ केली. त्यामुळे अश्विनने विरोध केला. दोघांत झटापट सुरू होताच अनिकेतने चाकू काढून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. अश्विनने तो उजव्या हाताने पकडल्याने त्याला दुखापत झाली. दरम्यान, चांदनीने अश्विनला खाली पडलेले विटांचे तुकडे उचलून मारण्याचा प्रयत्न केला. आरडाओरड ऐकून बाजूची मंडळी धावली. त्यांनी भांडण सोडविले. त्यानंतर अश्विनने जरीपटका ठाण्यात तक्रार दिल्यावरून पोलिसांनी आरोपी अनिकेतला अटक केली.
------------