सोमवारपासून मिळणार पीएफचे व्याज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:17 IST2021-01-13T04:17:36+5:302021-01-13T04:17:36+5:30
नागपूर : केंद्र सरकारने सहा कोटींपेक्षा जास्त अंशधारकांच्या भविष्य निधी (पीएफ) खात्यात एकमुश्त ८.५ टक्के व्याजाची रक्कम ट्रान्सफर करण्याचा ...

सोमवारपासून मिळणार पीएफचे व्याज
नागपूर : केंद्र सरकारने सहा कोटींपेक्षा जास्त अंशधारकांच्या भविष्य निधी (पीएफ) खात्यात एकमुश्त ८.५ टक्के व्याजाची रक्कम ट्रान्सफर करण्याचा निर्णय घेतला आहे. याची अंमलबजावणी १ जानेवारी २०२१ पासून करण्यात येणार होती. पण पहिल्या आठवड्यात झाली नाही. पण भविष्य निधी संघटनेच्या नागपूर कार्यालयातील कर्मचाऱ्याने केंद्रीय स्तरावर पीएफ व्याजाच्या भुगतानाची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे सांगितले. सोमवार, ११ जानेवारीपासून पीएफच्या व्याजाचे भुगतान सुरू होणार आहे.
या संदर्भात कर्मचारी भविष्य निधी संघटना, नागपूर कार्यालयाचे क्षेत्रीय आयुक्त विकास कुमार म्हणाले, अंशधारकांना पीएफच्या व्याजाची प्रक्रिया केंद्रीय स्तरावर सुरू करण्यात आली आहे. नागपूर कार्यालयातर्फे शुक्रवारपासून ही प्रक्रिया सुरू होणार आहे. सोमवार, ११ जानेवारीपासून पीएफ व्याजाचे भुगतान सुरू होईल. ज्यांच्या पीएफची संपूर्ण रक्कम भरण्यात आली आहे, अशा अंशधारकांना व्याजाच्या भुगतानासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. याचे मुख्य कारण असे की, कोरोना महामारीमुळे अनेक अंशधारकांच्या खात्यात पीएफची आवश्यक रक्कम जमा करण्यात आलेली नाही. अशा अंशधारकांना पीएफ व्याजाचे भुगतान नंतर करण्यात येणार आहे.
गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात केंद्रीय श्रममंत्री संतोष गंगवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विश्वस्तांच्या बैठकीत ईपीएफओने व्याजाला ८.१५ टक्के आणि ०.३५ टक्के रक्कम दोन हप्त्यात टाकण्याचा निर्णय घेतला होता. श्रम मंत्रालयाने वित्त मंत्रालयाला या महिन्याच्या सुरुवातीला वर्ष २०१९-२० करिता कर्मचारी भविष्य निधीवर व्याजाचा दर ८.५ टक्के (एका वेळेत पूर्ण व्याज) भुगतान करण्याचा प्रस्ताव पाठविला होता. या प्रस्तावाला वित्त मंत्रालयाने मंजुरी दिली आहे.
पीएफ व्याजाची रक्कम खातेधारकांना कठीणसमयी कामाला येते, हे विशेष. याच्या माध्यमातून खासगी कंपन्यांमध्ये कार्यरत कर्मचारी आणि सेवानिवृत्तीनंतर खातेधारकांना एकमुश्त मोठी रक्कम मिळते.