पेट्रोल पंप चालकांचे आंदोलन अपयशी
By Admin | Updated: April 12, 2015 02:25 IST2015-04-12T02:25:23+5:302015-04-12T02:25:23+5:30
विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने शनिवारी ...

पेट्रोल पंप चालकांचे आंदोलन अपयशी
नागपूर : विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने शनिवारी पुकारलेले एक दिवसीय आंदोलन काही पंपचालकांमुळे अपयशी ठरले आहे.
असोसिएशनच्या निर्णयानुसार संपादरम्यान पंप शनिवारी सकाळी ८ ते रात्री ८ या वेळात एका शिफ्टमध्ये सुरू ठेवण्यात येणार होते. पण काही पंपचालकांनी सकाळी ७ ते रात्री १० पर्यंत पंप सुरू ठेवले. यावरून असोसिएशनमध्ये फूट असल्याचे दिसून आले. सीआयपीडी या राष्ट्रीय पातळीवरील पेट्रोलियम डीलर्स संघटनेच्या आदेशानुसार महाराष्ट्रातील फामपेडशी संलग्न विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने ११ एप्रिलला पेट्रोल खरेदी बंद आंदोलन पुकारले होते. त्यानुसार त्यांनी खरेदी केली नाही. नागपुरातील जवळपास ८० पंपचालकांपैकी काही संपात सहभागी झाले नसल्याची महिती आहे.(प्रतिनिधी)