नागपुरात पेट्रोल तब्बल १ पैशाने स्वस्त; सोशल मिडियावर खिल्ली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 10:10 IST2018-05-30T10:10:20+5:302018-05-30T10:10:33+5:30

देशाच्या तेल कंपन्यांनी १६ दिवसापर्यंत पेट्रोल-डिझेलच्या दरात लागोपाठ वाढ केल्यानंतर १७ व्या दिवशी घोषित करण्यात आलेल्या पेट्रोलच्या दरात प्रति लिटरमागे १ पैशाची कपात केली आहे.

Petrol is cheaper by 1 paise in Nagpur | नागपुरात पेट्रोल तब्बल १ पैशाने स्वस्त; सोशल मिडियावर खिल्ली

नागपुरात पेट्रोल तब्बल १ पैशाने स्वस्त; सोशल मिडियावर खिल्ली

ठळक मुद्देपेट्रोलच्या दरात प्रति लिटरमागे १ पैशाची कपात

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशाच्या तेल कंपन्यांनी १६ दिवसापर्यंत पेट्रोल-डिझेलच्या दरात लागोपाठ वाढ केल्यानंतर १७ व्या दिवशी घोषित करण्यात आलेल्या पेट्रोलच्या दरात प्रति लिटरमागे १ पैशाची कपात केली आहे. तिन्ही कंपन्यांच्या पंपावर बुधवारी एक पैसा स्वस्त पेट्रोल व डिझेल मिळणार आहे. नागपूर शहरात भारत पेट्रोलियमचे पंपावर बुधवारी पेट्रोल ८६.६७ रुपये प्रति लिटर, डिझेल ७४.२६ व स्पीड पेट्रोल ८९.४८ रुपयांना मिळेल. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किमतीत होत असलेल्या चढ-उतारामुळे गेल्या पंधरवड्यात पेट्रोल आणि डिझेल चार रुपये प्रति लिटरने वाढले होते. अशात तेल कंपन्यांद्वारे करण्यात आलेली एक पैशाची कपात ही अत्यल्प आहे. तेल कंपन्यांच्या या घोषणेची सोशल मीडियावर भरपूर खिल्ली उडविली जात आहे.

Web Title: Petrol is cheaper by 1 paise in Nagpur