शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
3
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
4
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
5
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
6
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
7
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
9
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
10
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
11
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
12
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
13
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
14
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
15
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
16
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
17
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
18
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
19
आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा
20
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

इंडिया बुल्स कंपनीविरुद्ध हायकोर्टात याचिका

By admin | Updated: April 11, 2016 03:14 IST

रोड दुरुस्तीसंदर्भातील कराराची पायमल्ली केल्यामुळे इंडियाबुल्स पॉवर कंपनीविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर

नागपूर : रोड दुरुस्तीसंदर्भातील कराराची पायमल्ली केल्यामुळे इंडियाबुल्स पॉवर कंपनीविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व स्वप्ना जोशी यांनी इंडियाबुल्स कंपनीसह अन्य प्रतिवादींना नोटीस बजावून तीन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.विजय मुंडाळे असे याचिकाकर्त्याचे नाव आहे. याचिकेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव, ऊर्जा, उद्योग व कामगार विभागाचे प्रधान सचिव, अमरावती विभागीय आयुक्त, अमरावती जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आदींचा समावेश आहे. नांदगावपेठ एमआयडीसी येथे इंडियाबुल्स कंपनीचा एक हजार मेगावॅटचा सोफिया वीज निर्मिती प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी वलगाव-नांदगावपेठ रोडवरून कोळसा आणण्यात येतो. यामुळे हा रोड खराब झाला आहे. प्रकल्प उभारण्यापूर्वी इंडियाबुल्स कंपनी व सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये करार झाला आहे. त्यात रोडची देखभाल व दुरुस्ती कंपनी करेल असे ठरले आहे. परंतु, आतापर्यंत कंपनीने एकदाही रोडची दुरुस्ती केली नाही. परिणामी नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अपघाताचे प्रमाण वाढले आहे. रोडवरील धुरामुळे नागरिक आजारी पडत आहेत असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. अरुण पाटील यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)