कीटकनाशके हाताळणी, फवारणी प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:08 IST2021-09-03T04:08:48+5:302021-09-03T04:08:48+5:30
नरखेड : कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा)च्यावतीने नरखेड पंचायत समितीच्या सभागृहात कीटकनाशके हाताळणी व फवारणी प्रशिक्षण ...

कीटकनाशके हाताळणी, फवारणी प्रशिक्षण
नरखेड : कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा)च्यावतीने नरखेड पंचायत समितीच्या सभागृहात कीटकनाशके हाताळणी व फवारणी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. यात नरखेड तालुक्यातील शेतकरी व शेतमजुरांना प्रशिक्षण देण्यात आले.
याप्रसंगी डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कीटकशास्त्रज्ञ तथा सहायक प्राध्यापक डाॅ. प्रदीप दवणे, उपविभागीय कृषी अधिकारी डॉ. योगीराज जुमडे, कृषी पर्यवेक्षक पंकज काेकाटे व युपीएलचे याेगेश खाेपे यांनी शेतकरी व शेतमजुरांना विविध कीटकनाशके हाताळणे व फवारणी करण्याच्या सुरक्षित पद्धतीवर मार्गदर्शन केले. त्यांना प्रात्यक्षिकांद्वारे त्या समजावून सांगत त्याचे प्रशिक्षण दिले. यावेळी पंचायत समिती सभापती नीलिमा रेवतकर, पंचायत समितीचे कृषी अधिकारी सराेदे, कुंभारे, गतफाणे उपस्थित हाेते. संचालन तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक नीलेश रिधोरकर यांनी केले. प्रशिक्षण कार्यक्रमाला तालुक्यातील ५० शेतकरी, शेतमजूर उपस्थित हाेते. यात महिला शेतकऱ्यांचाही समावेश हाेता.