शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील दिव्यांगांच्या शाळा झाल्या ‘कायम’ दिव्यांग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 10:48 IST

राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत येणाऱ्या दिव्यांगांच्या शाळा, कर्मशाळा शासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे कायमस्वरूपी दिव्यांग होण्याच्या मार्गावर आहेत.

ठळक मुद्दे१६४ शाळांना मिळेना सामाजिक न्याय अवर सचिवांकडे नऊ महिन्यांपासून प्रस्ताव पडून

कमलेश वानखेडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत येणाऱ्या दिव्यांगांच्या शाळा, कर्मशाळा शासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे कायमस्वरूपी दिव्यांग होण्याच्या मार्गावर आहेत. आॅगस्ट २००४ मध्ये ‘कायमस्वरूपी विना अनुदान तत्त्वावर’ या शाळांना मान्यता देण्यात आली. तेव्हापासून गेल्या १४ वर्षांचा ‘कायम’ वनवास या शाळा भोगत आहेत. कुठल्याही अनुदानाशिवाय सुरू असलेल्या या शाळाच आता दिव्यांग होण्याच्या मार्गावर आहेत.सामाजिक न्याय विभागाच्या ८०० वर शाळा असताना नियमांना बगल देत फक्त १७७ शाळांचा ‘कायम’ शब्द वगळून १२३ शाळांना अनुदान तत्त्वावर मान्यता देण्यात आली. उर्वरित शाळांचे मात्र ‘कायम’चे ग्रहण सुटले नाही. त्यामुळे दिव्यांगासाठी काम करणाऱ्या विविध शैक्षणिक संस्थांनी ही मागणी शासनाकडे लावून धरली. शेवटी १३ जानेवारी २०१६ रोजी जिल्हाधिकाऱ्यामार्फत तपासणी करून ‘अ’ श्रेणीतील शाळांचा ‘कायम’ शब्द वगळण्यासाठी अपंग कल्याण आयुक्तांना आदेशीत करण्यात आले. या अनुषंगाने आयुक्तांनी फेब्रुवारी २०१६ ला राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना तपासणी करून अहवाल सादर करण्यास सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांनी दिव्यांगांच्या शाळांची तपासणी करून तसे अहवाल शासनास सादर केले.आयुक्तांनी तपासणी केलेल्या शाळांचे ‘कायम’ शब्द काढण्याचे प्रस्ताव शासनास सादरच केले नाही. त्यामुळे दिव्यांगासाठी काम करणाºया स्वयंसेवी संस्थांच्या संचालकांनी आ. परिणय फुके यांच्या माध्यमातून शासनाकडे विनंती केली. आ. फुके यांनी १६ मार्च २०१७ रोजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांना पत्र देऊन ५ एप्रिल २०१७ रोजी बैठक बोलावली. या बैठकीत सामाजिक न्यायमंत्र्यांसह राज्यमंत्री, आ. अनिल सोले, परिणय फुके, गिरीश व्यास, नागो गाणार, सामाजिक न्याय विभागाचे सचिव, आयुक्त आदी उपस्थित होते. या बैठकीत सामान्य शाळांचा ‘कायम’ शब्द वगळण्यात आला त्याच धर्तीवर दिव्यांग शाळांचा ‘कायम’ शब्द वगळण्यात यायला हवा, अशी सकारात्मक चर्चा झाली. ‘कायम’ शब्द वगळण्याकरिता ‘अ’ श्रेणीतील प्रस्ताव शासनास सादर करावे, असे निर्देशही आयुक्तांना देण्यात आले. या बैठकीतील निर्देशानुसार आयुक्तांनी १७ जून २०१७ रोजी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तपासणी करून प्रस्ताव शासनास सादर केले. त्यावर शासनातर्फे पुन्हा एकदा अभिप्राय मागविण्यात आले. त्यानुसार १३ डिसेंबर २०१७ रोजी आयुक्तांनी २०८ शाळांची कायम शब्द काढण्यास हरकत नसल्याचे अभिप्राय दिले. असे असतानाही अद्याप ‘कायम’च्या जाचातून दिव्यांग शाळांना मुक्ती मिळालेली नाही.

विशिष्ट हेतूने प्रस्ताव प्रलंबितसामाजिक न्याय विभागाचे अवर सचिव कामटे यांच्याकडे गेल्या नऊ महिन्यांपासून ‘कायम’ शब्द वगळण्याचा प्रस्ताव प्रलंबित आहेत. हे प्रस्ताव विशिष्ट हेतूने प्रलंबित ठेवण्यात आल्याचा शाळा संचालकांचा आरोप आहे. येत्या काळात शाळा चालक या विरोधात उघड आवाज उठवून मंत्रालयात सामाजिक न्यायमंत्र्यांच्या दालनातच आंदोलन करण्याच्या विचारात आहेत.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र