क्रौर्याची परिसीमा; 'मला मुलगी पाहिजे हाेती' असे म्हणत जन्मदात्यानेच केली मुलाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 13:39 IST2021-05-27T13:38:49+5:302021-05-27T13:39:47+5:30

Nagpur News रागाच्या भरात जन्मदात्या पित्यानेच एकवर्षीय चिमुकल्याची दगडावर आपटून हत्या केली. ही हृदयद्रावक घटना खापा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील वाकाेडी येथे मंगळवारी (दि.२५) रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली.

Perimeter of cruelty; Saying 'I want a girl', the father killed the boy | क्रौर्याची परिसीमा; 'मला मुलगी पाहिजे हाेती' असे म्हणत जन्मदात्यानेच केली मुलाची हत्या

क्रौर्याची परिसीमा; 'मला मुलगी पाहिजे हाेती' असे म्हणत जन्मदात्यानेच केली मुलाची हत्या

ठळक मुद्देवाकाेडी येथील हृदयद्रावक घटना

 

लाेकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : पती- पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण झाले. अशात रागाच्या भरात जन्मदात्या पित्यानेच एकवर्षीय चिमुकल्याची दगडावर आपटून हत्या केली. ही हृदयद्रावक घटना खापा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील वाकाेडी येथे मंगळवारी (दि.२५) रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली. दरम्यान, पाेलिसांनी आराेपी पित्याविरुद्ध गुन्हा नाेंदवून त्यास अटक केली आहे.

सत्यम भजन काैरती (१ वर्ष) असे मृत चिमुकल्याचे नाव असून, भजन मेहता काैरती (४०, ढिवर माेहल्ला, वाकाेडी, ता. सावनेर) असे अटक करण्यात आलेल्या आराेपी पित्याचे नाव आहे. मंगळवारी आराेपी भजन याने पत्नीकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. यावरून पती- पत्नीमध्ये भांडणाला सुरुवात झाली. भांडणामध्ये ‘मला मुलगी पाहिजे हाेती; पण तुला मुलगा झाला,’ असे म्हणत आराेपीने रागाच्या भरात मुलाला घराच्या अंगणात नेऊन दगडावर आपटले. त्यात मुलाचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

याप्रकरणी मथुरा भजन काैरती (३२, रा. ढिवर माेहल्ला, वाकाेडी, ता. सावनेर) यांच्या तक्रारीवरून खापा पाेलिसांनी आराेपीविरुद्ध भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, आराेपीस अटक केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पाेलीस निरीक्षक अजय मानकर करीत आहेत.

Web Title: Perimeter of cruelty; Saying 'I want a girl', the father killed the boy