बोनसने वाढविला टक्का
By Admin | Updated: June 14, 2017 01:09 IST2017-06-14T01:09:49+5:302017-06-14T01:09:49+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेच्या निकालात कला, क्रीडा यासाठी देण्यात आलेल्या अतिरिक्त (बोनस) गुणांमुळे

बोनसने वाढविला टक्का
अनेक विद्यार्थ्यांना ९९ टक्क्यांहून अधिक गुण
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेच्या निकालात कला, क्रीडा यासाठी देण्यात आलेल्या अतिरिक्त (बोनस) गुणांमुळे विद्यार्थ्यांवर अक्षरश: गुणांचा वर्षाव झालेला दिसून आला. यामुळे शहरातील अनेक विद्यार्थ्यांना चक्क ९९ टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त झाले तर बऱ्याच जणांनी चक्क १०० टक्क्यांपर्यंत मजल मारली. ‘मान्सून’च्या सुरुवातीला झालेल्या या गुणांच्या पावसामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते.
यंदाही उत्तीर्णांच्या उपराजधानीत विद्यार्थिनींचाच वरचष्मा दिसून आला. जर विद्यार्थ्यांचे अतिरिक्त गुणांविना टक्केवारी लक्षात घेतली तर सोमलवार हायस्कूल रामदासपेठ येथील आदित्य लोटे याने ९८.६० टक्के (४९३ गुण) मिळवीत प्रथम स्थान पटकाविले.