‘कट आॅफ’चा टक्का वाढला

By Admin | Updated: July 20, 2014 01:17 IST2014-07-20T01:17:29+5:302014-07-20T01:17:29+5:30

केंद्रीय प्रवेश समितीतर्फे राबविण्यात येणाऱ्या अकरावी प्रवेशप्रक्रियेची अंतिम यादी शनिवारी जारी करण्यात आली. निकालाप्रमाणेच यंदा विज्ञान शाखेतील नामांकित महाविद्यालयांतील ‘कट आॅफ’ची

The percentage of 'cut off' increased | ‘कट आॅफ’चा टक्का वाढला

‘कट आॅफ’चा टक्का वाढला

अकरावी प्रवेशप्रक्रिया : विज्ञान शाखेसाठी दिसून आली चुरस
नागपूर : केंद्रीय प्रवेश समितीतर्फे राबविण्यात येणाऱ्या अकरावी प्रवेशप्रक्रियेची अंतिम यादी शनिवारी जारी करण्यात आली. निकालाप्रमाणेच यंदा विज्ञान शाखेतील नामांकित महाविद्यालयांतील ‘कट आॅफ’ची टक्केवारी वाढलेली दिसून आली. कला व वाणिज्य शाखेच्या तुलनेत विज्ञान शाखेतच जास्त चुरस असून कला शाखेत तर ३५ टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यालादेखील सहज प्रवेश मिळाला आहे.
विज्ञान शाखेत डॉ.आंबेडकर महाविद्यालय व शिवाजी विज्ञान महाविद्यालयात अनुदानित जागांवर खुल्या प्रवर्गासाठी ‘कट आॅफ’ ९४.६० % व ९४.४०% राहिला. टॉप १५ मध्ये असलेल्या इतर महाविद्यालयांत ७७ पासून ते ९०.८० टक्के ‘कट आॅफ’ राहिला. अनेक विद्यार्थ्यांना पसंतीच्या महाविद्यालयांत प्रवेश न मिळाल्याने ते निराश झाले.
दुसरीकडे कला व वाणिज्य अभ्यासक्रमात केवळ निवडक महाविद्यालयांत ‘कट आॅफ’ जास्त राहिला. कला शाखेत सर्वात जास्त ८४ % ‘कट आॅफ’ आंबेडकर महाविद्यालयाचा राहिला. तर वाणिज्य शाखेतदेखील ९०.६० टक्क्यांसह याच महाविद्यालयाची ‘कट आॅफ’ची टक्केवारी सर्वात जास्त राहिली. विद्यार्थ्यांना २२ जुलैपर्यंत प्रवेश घ्यायचे आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: The percentage of 'cut off' increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.