कमलेश वानखेडे, नागपूर लोकमत न्यूज नोटवर्कनागपूर : काही लोक धक्का पुरुष झाले आहेत. विधानसभा निवडणुकीत लोकांनी त्यांना धक्का देऊन बाहेर बसवले. त्यांनी बाळासाहेबांचे विचारांना धक्का दिला, बाळासाहेबांचा विचार सोडला. पक्षातील चांगल्या लोकांना धक्का मारून पक्ष बाहेर काढणारे जे नेते आहे, जनता त्यांना धक्का दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच शिवसैनिक आमच्या सोबत येत आहे, विश्वास दाखवत आहे. शेअर बाजारात ज्या शेअरची पत असते, ते शेअर लोक खरेदी करतात, अशीच आमची शिवसेना आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
‘ऑपरेशन टायगर’ अंतर्गत विविध पक्षाच्या नेत्यांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश होत आहेत. यासाठी शिंदे शुक्रवारी नागपुरात दाखल झाले. यावेळी पत्रकारांशी बोलताना शिंदे म्हणाले, आज विदर्भ दौऱ्यात दोन मेळावे आयोजित केले आहे. निवडणूक प्रचारात मी सांगितले होते की निवडणूक जिंकल्यानंतर मी येईल. त्या अनुषंगाने हा दौरा आहे. आभार मानायला मी विदर्भात आलो आहे.मी अगोदरच म्हटलवे होते की मला हलक्यात घेऊ नका. मी बाळासाहेब आणि दिघे साहेबांचा चा कार्यकर्ता आहे. जेव्हा मला हलक्यात घेतलं तेव्हा २०२२ मध्ये टांगा पलटी करून दिला, सरकार बदलले. हा इशारा ज्यांना समजायचा आहे त्यांनी समजून घ्यावे, मी माझं काम करत राहील, असे शिंदे म्हणाले. धमक्यांना भीक घालत नाही
- मला यापूर्वीही धमक्या आल्या होत्या. डान्सबार बंद केले तेव्हाही खूप धमक्या आल्या होत्या. तसे प्रयत्नही झाले. मात्र मी घाबरलो नाही. नक्षलवाद्यांनीही धमकी दिली होती, मात्र मी धमक्यांना भीक घातली नाही. गडचिरोलीत पहिला औद्योगिक प्रकल्प सुरू करण्याचे काम मी केले, असेही शिंदे यांनी सांगितले.
- पालकमंत्री संदर्भातला तिढा लवकर सुटेल.
- मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद होणार नाही.
- एसटीमध्ये महिलांना ५० टक्के ची सवलत बंद केली जाणार नाही.
- पेपर फुटीची चौकशी केली जाईल. कॉपीमुक्त महाराष्ट्र करण्याचा आमच्या सरकारचा संकल्प आहे.