शहरं
Join us  
Trending Stories
1
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
2
Top Marathi News LIVE Updates: मस्साजोगच्या पोटनिवडणुकीत धक्कादायक निकाल; अश्विनी देशमुख पराभूत
3
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
4
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
5
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
6
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
7
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
8
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
9
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
10
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
11
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
12
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
13
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
14
उन्हामुळे शरीराचे ‘हे’ तीन अवयव होऊ शकतात निकामी; डॉक्टरांनी दिले ६ खास सल्ले, जाणून घ्या
15
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
16
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
17
पाणी येताच दारी, ‘लक्ष्मी’ आली घरी! दुर्गम सातपुड्यातील नागझरीमधील हाऱ्यापाड्यावरची अनोखी ‘जलकहाणी’
18
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
19
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
20
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सेवानिवृत्त न्यायालयीन कर्मचाऱ्यांची शेट्टी आयोगानुसार पेन्शनची मागणी

By admin | Updated: April 27, 2015 02:02 IST

सेवेत असताना शेट्टी आयोगानुसार वेतन आणि सेवानिवृत्तीनंतर सहाव्या वेतन आयोगानुसार सेवानिवृत्ती या प्रकारात सेवानिवृत्त न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.

यवतमाळ : सेवेत असताना शेट्टी आयोगानुसार वेतन आणि सेवानिवृत्तीनंतर सहाव्या वेतन आयोगानुसार सेवानिवृत्ती या प्रकारात सेवानिवृत्त न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याला दरमहा सरासरी चार हजार ५०० रुपयांच्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील ३५ ते ४० सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना या बाबीची झळ पोहोचत आहे. न्यायालयीन कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगानुसार २००६ पासून वेतनाचा लाभ मिळत होता. परंतु न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी वेगळ्या वेतनश्रेणीची मागणी केली. यानुसार शेट्टी आयोगाच्या अहवालानुसार सर्व न्यायालयीन कर्मचाऱ्यांना वेगळी वेतनश्रेणी निश्चित करण्यात आली. ही वेतनश्रेणी देण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला. कार्यरत असताना या आयोगानुसार वेतन दिले जाते. परंतु सेवानिवृत्तीनंतर सहाव्या वेतन आयोगानुसार सेवानिवृत्ती वेतनाचा लाभ दिला जातो. शेट्टी आयोगानुसार सेवानिवृत्तीचा लाभ दिल्यास प्रत्येक सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला किमान २२ हजार रुपयांपर्यंत सेवानिवृत्ती वेतन मिळू शकते. आता मात्र त्यांना सहाव्या वेतन आयोगानुसार केवळ १७ हजार रुपयांवर समाधान मानावे लागत आहे. ही बाब निवृत्तांवर अन्याय करणारी असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. निवृत्त ज्येष्ठ न्यायालयीन कर्मचाऱ्यांनाही शेट्टी आयोगानुसार निवृत्ती वेतन व थकबाकी मिळावी, अशी मागणी सेवानिवृत्त न्यायालयीन कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे. (वार्ताहर)