नागपूर-अमरावतीमधील प्रलंबित वैद्यकीय प्रकल्प मार्गी लागणार; महसूलमंत्री बावनकुळेंचे उच्चस्तरीय बैठकीत निर्देश

By योगेश पांडे | Updated: December 13, 2025 18:52 IST2025-12-13T18:50:51+5:302025-12-13T18:52:03+5:30

Nagpur : या बैठकीला वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, नागपूर आणि अमरावतीचे जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त तसेच वैद्यकीय शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Pending medical projects in Nagpur-Amravati will be on track; Revenue Minister Bawankule directs in high-level meeting | नागपूर-अमरावतीमधील प्रलंबित वैद्यकीय प्रकल्प मार्गी लागणार; महसूलमंत्री बावनकुळेंचे उच्चस्तरीय बैठकीत निर्देश

Pending medical projects in Nagpur-Amravati will be on track; Revenue Minister Bawankule directs in high-level meeting

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
नागपूर आणि अमरावती जिल्ह्यातील वैद्यकीय शिक्षण व आरोग्य विभागाशी संबंधित प्रलंबित कामे आणि प्रस्ताव तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. विधानभवनात शनिवारी वैद्यकीय प्रकल्पांसंदर्भात उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

या बैठकीला वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, नागपूर आणि अमरावतीचे जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त तसेच वैद्यकीय शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीदरम्यान नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय आणि शासकीय दंत महाविद्यालयाच्या विविध विकासाकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

मेडिकलच्या टी.बी. वॉर्ड परिसरात कर्करुग्णालयासाठी एक मजला वाढवून मिळणे, सिकलसेल आणि थॅलेसिमिया हॉस्पिटलचे बांधकाम, तसेच डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांसाठी नवीन निवासस्थानांच्या बांधकामाला गती देण्यावर चर्चा झाली. तसेच, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या 'ए', 'बी' आणि 'सी' विंगमधील अतिदक्षता विभाग आणि ऑपरेशन थिएटरच्या अद्ययावतीकरणाचे काम करण्याच्या हालचालींचा आढावा घेण्यात आला. संबंधित विभागांना या सर्व कामांचे प्रस्ताव तातडीने सादर करून वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

मेयोच्या पदभरतीसंदर्भात चर्चा

मेयो रुग्णालयातील वाढीव १३६० खाटांच्या क्षमतेसाठी आवश्यक मनुष्यबळ आणि बाह्यस्त्रोतामार्फत पदभरती करण्याबाबत यावेळी चर्चा झाली. यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्देशानुसार वर्ग १ ते वर्ग ४ ची पदे मंजूर करणे आणि ५२६ सफाई कामगारांची रिक्त पदे भरण्यावर भर देण्यात येणार आहे.

अमरावतीतील महाविद्यालयासाठी यंत्रसामुग्री खरेदी होणार
अमरावतीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २०२५-२६ या वर्षात दुसऱ्या वर्षाच्या एम.बी.बी.एस. अभ्यासक्रमासाठी आवश्यक यंत्रसामुग्री खरेदीस प्रशासकीय मान्यता आणि निधी उपलब्ध करून देण्याबाबत निर्देश बावनकुळे यांच्याकडून देण्यात आले.

आयुर्वेद महाविद्यालयाची प्रवेश क्षमता वाढण्याचे संकेत

नागपूरच्या शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाची विद्यार्थी प्रवेश क्षमता १०० वरून २०० पर्यंत वाढवणे आणि चार नवीन विषयात पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी नवीन इमारतींचे बांधकाम व २१४ नवीन पदांची निर्मिती करण्याच्या प्रस्तावावर चर्चा झाली.

Web Title : नागपुर-अमरावती चिकित्सा परियोजनाएँ आगे बढ़ेंगी; मंत्री बावनकुले ने दिए निर्देश

Web Summary : नागपुर और अमरावती में लंबित चिकित्सा परियोजनाएँ आगे बढ़ने के लिए तैयार हैं। मंत्री बावनकुले ने चिकित्सा महाविद्यालयों, अस्पतालों और बुनियादी ढाँचे के उन्नयन से संबंधित कार्यों में तेजी लाने के लिए अधिकारियों को निर्देश दिए। चर्चाओं में सुविधाओं का विस्तार, स्टाफ रिक्तियों को भरना और बेहतर स्वास्थ्य सेवा के लिए उपकरण खरीदना शामिल था।

Web Title : Nagpur-Amravati Medical Projects to Proceed; Minister Bawankule Issues Directives

Web Summary : Pending medical projects in Nagpur and Amravati are set to advance. Minister Bawankule directed officials to expedite works related to medical colleges, hospitals, and infrastructure upgrades. Discussions included expanding facilities, filling staff vacancies, and procuring equipment for improved healthcare services.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.