शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
2
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
3
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
4
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
5
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
6
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
7
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
8
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
9
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
10
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
11
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
12
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
13
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
14
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
15
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
16
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
17
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
18
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
19
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
20
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

सुरक्षित वीज वितरणासाठी दोषींकडून दंड वसुली?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2019 9:00 PM

शहरातील वीज वितरण प्रणालीमधील धोके दूर करून तिला पूर्णत: सुरक्षित करण्यासाठी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून दंड वसूल करण्यात यावा अशी शिफारस विशेष समितीने केली आहे. शहरातील हायटेंशन लाईनजवळच्या अवैध बांधकामांचे सर्वेक्षण करणे व त्यावर प्रभावी उपाययोजना सुचविणे यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ही समिती स्थापन केली आहे.

ठळक मुद्देविशेष समितीची शिफारस : हायकोर्टात पाचवा अहवाल सादर

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : शहरातील वीज वितरण प्रणालीमधील धोके दूर करून तिला पूर्णत: सुरक्षित करण्यासाठी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून दंड वसूल करण्यात यावा अशी शिफारस विशेष समितीने केली आहे. शहरातील हायटेंशन लाईनजवळच्या अवैध बांधकामांचे सर्वेक्षण करणे व त्यावर प्रभावी उपाययोजना सुचविणे यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ही समिती स्थापन केली आहे.या समितीने ३१ मे २०१९ पर्यंत दोन तृतीयांश शहराचे सर्वेक्षण केले व त्याचा अहवाल मंगळवारी न्यायालयात सादर केला. हा समितीचा पाचवा अहवाल होय. त्यामध्ये ही शिफारस करण्यात आली. वीज वितरण प्रणाली धोकादायक होण्यामध्ये नागपूर सुधार प्रन्यास, महानगरपालिका, महावितरण, एसएनडीएल व संबंधित नागरिक जबाबदार आहेत. त्यांनी आपापल्या कर्तव्यांचे काटेकोर पालन केले नाही. कायदेशीर तरतुदी व नियम पायदळी तुडवले. त्यामुळे त्यांची जबाबदारी निश्चित होणे आवश्यक आहे असे मत समितीने व्यक्त करून नासुप, मनपा व महावितरण यांची प्रत्येकी २५ टक्के, एसएनडीएलची १५ तर, संबंधित नागरिकांची १० टक्के जबाबदारी निश्चित केली. तसेच, भूखंडाच्या आकारानुसार रहिवासी ग्राहकांकडून १० रुपये तर, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडून २० रुपये प्रती चौरस फुटाप्रमाणे दंड वसूल करण्यास सांगितले.३१ मे २०१७ रोजी प्रियांश व पीयूष धर ही जुळी मुले सुगतनगर, नारा येथील एका सदनिकेच्या गॅलरीत खेळताना हायटेंशन लाईनच्या संपर्कात आली होती. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला होता. उच्च न्यायालयाने त्या घटनेची गंभीर दखल घेऊन यासंदर्भात स्वत:च जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. या प्रकरणात अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर न्यायालय मित्र असून इतर पक्षकारांतर्फे अ‍ॅड. शशिभूषण वहाणे, अ‍ॅड. सुधीर पुराणिक, अ‍ॅड. उल्हास औरंगाबादकर आदींनी कामकाज पाहिले.३९३४ ठिकाणी धोकादायक बांधकामसमितीने १२६ हाय व्होल्टेज फिडर्सच्या परिसराचे सर्वेक्षण केले. दरम्यान, समितीला ३९३४ ठिकाणी धोकादायक बांधकाम आढळून आले. त्यापैकी ३९१२ ठिकाणी वीज जोडणी आहे. त्यातील ३१०० ठिकाणे रहिवासी, ६५० ठिकाणे वाणिज्यिक तर, १२२ ठिकाणे औद्योगिक आहेत. नासुप्रच्या हद्दीत १९०० तर, मनपाच्या हद्दीत २००० ठिकाणे आहेत. ३५०२ जणांकडे इमारतीचा मंजूर आराखडा नाही. नासुप्र व मनपाच्या उदासीनतेमुळे त्यांनी मनमानीपणे बांधकाम केले आहे. तसेच, महावितरण व एसएनडीएल यांनी वीज जोडण्या देताना नियमांचे पालन केले नाही अशी माहिती अहवालात नमूद करण्यात आली आहे.उपायांवर एकूण २६ कोटी रुपये खर्चवीज वितरण प्रणाली सुरक्षित करण्यासाठी धोकादायक हायटेंशन लाईन दुसरीकडे हलविणे, हायटेंशन लाईनला ओव्हरहेड इन्शुलेटेड एयर बंच केबल लावणे, हायटेंशन लाईन भूमिगत करणे किंवा हायटेंशन लाईनजवळचे अवैध बांधकाम पाडणे हे उपाय करणे आवश्यक आहे. अवैध बांधकाम पाडायचे झाल्यास ४६८ ठिकाणी कारवाई करावी लागणार आहे. तसेच, संपूर्ण वीज वितरण प्रणाली सुरक्षित करण्यासाठी एकूण २६ कोटी रुपये खर्च येऊ शकतो. त्यानंतर दोन तृतियांश शहरातील वीज वितरण प्रणाली सुरक्षित होईल असेही समितीने अहवालात म्हटले आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयelectricityवीज