विना मास्क फिरणाऱ्यांवर ठाेठावला दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:09 IST2021-02-26T04:09:25+5:302021-02-26T04:09:25+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क टाकळघाट : महसूल व पाेलीस विभागाने बुटीबाेरी एमआयडीसी व टाकळघाट परिसरात विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई ...

Penalties imposed on those without masks | विना मास्क फिरणाऱ्यांवर ठाेठावला दंड

विना मास्क फिरणाऱ्यांवर ठाेठावला दंड

लाेकमत न्यूज नेटवर्क

टाकळघाट : महसूल व पाेलीस विभागाने बुटीबाेरी एमआयडीसी व टाकळघाट परिसरात विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करायला सुरुवात केली आहे. या पथकाने ४३ जणांवर दंडात्मक कारवाई करीत त्यांच्याकडून एकूण ६,३५० रुपयाचा दंड वसूल केला, अशी माहिती ठाणेदार मारुती मुळूक यांनी दिली.

काेराेना संक्रमण पुन्हा वाढत असताना नागरिक विना मास्क फिरत आहेत. ही बाब काेराेना प्रतिबंधक उपाययाेजनांचे उल्लंघन करणारी असल्याने जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या आदेशान्वये संबंधितांवर कारवाई केली जात असल्याची माहिती मारुती मुळूक यांनी दिली. या पथकाने बुटीबाेरी औद्याेगिक वसाहत व टाकळघाट परिसरातील राेडवर फिरणाऱ्यांची तपासणी केली. यात ज्या नागरिकांनी मास्क वापरला नव्हता, त्यांना थांबवून त्यांच्याकडून दंड वसूल केला.

या कारवाईमध्ये ४३ नागरिकांकडून ६,३५० रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही माेहीम यापुढेही सुरू राहणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने घराबाहेर पडताना मास्क वापरावा तसेच फिजिकल डिस्टन्सिंगचे काटेकाेर पालन करावे, असे आवाहनही मारुती मुळूक यांनी केले. एमआयडीसी बुटीबाेरीचे ठाणेदार मारुती मुळूक यांच्या नेतृत्वातील पथकात मंडळ अधिकारी वैभव राठोड, तलाठी राहुल गिरी, रोहित आडे, योगेश मून, पंकज शहाकार, बीट जमादार शरद बन्सोड, अशोक शेडके यांच्यासह हाेमगार्डचा समावेश हाेता.

Web Title: Penalties imposed on those without masks