वाहनाच्या धडकेत पादचारी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:27 IST2020-12-15T04:27:31+5:302020-12-15T04:27:31+5:30
बुटीबाेरी : भरधाव अज्ञात वाहनाने राेडच्या कडेने पायी जात असलेल्या व्यक्तीला जाेरात धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेल्या त्या ...

वाहनाच्या धडकेत पादचारी ठार
बुटीबाेरी : भरधाव अज्ञात वाहनाने राेडच्या कडेने पायी जात असलेल्या व्यक्तीला जाेरात धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेल्या त्या व्यक्तीचा उपचाराला नेताना वाटेतच मृत्यू झाला. ही घटना बुटीबाेरी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील माेहगाव शिवारात रविवारी (दि. १३) रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली.
मृताचे वय ५० ते ५५ वर्षाच्या दरम्यान असून, ती व्यक्ती रात्री माेहगाव शिवारातून राेडच्या कडेने पायी जात हाेती. दरम्यान, भरधाव अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ताे गंभीर जखमी झाला. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून त्याला लगेच नागपूर येथील शासकीय रुग्णालयात हलविले. मात्र, डाॅक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घाेषित केले. वृत्त लिहिस्ताे मृताची ओळख पटली नव्हती. याप्रकरणी बुटीबाेरी पाेलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध भादंवि २७९, ३०४ (अ) अन्वये गुन्हा नाेंदविला असून, या घटनेचा तपास पाेलीस हवालदार भारत तायडे करीत आहेत.