टिप्परच्या धडकेत पादचारी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:09 IST2021-04-01T04:09:14+5:302021-04-01T04:09:14+5:30
कन्हान : भरधाव टिप्परचालकाने पादचाऱ्यास जाेरात धडक दिली. त्यात गंभीर दुखापत झाल्याने पादचाऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना कन्हान पाेलीस ...

टिप्परच्या धडकेत पादचारी ठार
कन्हान : भरधाव टिप्परचालकाने पादचाऱ्यास जाेरात धडक दिली. त्यात गंभीर दुखापत झाल्याने पादचाऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना कन्हान पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील जे.एन. राेड कांद्री कन्हान येथे मंगळवारी (दि.३०) सायंकाळी ७.१५ च्या सुमारास घडली.
अशाेक आशनदास माेटवाणी (६२, रा. कांद्री, कन्हान) असे मृताचे नाव आहे. ते रस्त्याने पायी जात असताना, एमएच ४०/एन ७५६६ क्रमांकाच्या भरधाव टिप्परचालकाने विरुद्ध दिशेने वाहन पळवून त्यांना धडक दिली. त्यात गंभीर दुखापत झाल्याने माेटवाणी यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी प्रकाश आशनदास माेटवाणी (५३, रा. पटेलनगर, पिपरी कन्हान) यांच्या तक्रारीवरून कन्हान पाेलिसांनी भादंवि कलम २७९, ३०४ (अ), सहकलम १८४ माेटार वाहन कायद्यान्वये गुन्हा नाेंदविला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पाेलीस हवालदार नरेश वरखडे करीत आहेत.