शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

वीज बिल भरणे आता अधिक सुलभ : पेमेंट वॉलेटचा पर्याय उपलब्ध, अतिरिक्त उत्पन्नही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 21:48 IST

वीज बिलाचा भरणा अधिक सुलभ व्हावा, यासाठी महावितरणने सातत्याने नवनवीन सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या आहेत. आता आणखी एक पाऊल पुढे टाकत महावितरणने स्वत:चे ‘पेमेंट वॉलेट’ आणले आहे. आवश्यक अटींची पूर्तता करणाऱ्या १८ वर्षांवरील कोणत्याही व्यक्तीला वॉलेटधारक होता येईल. यातून वीज ग्राहकांना विशेषत: ग्रामीण भागात वीज बिलाचा भरणा करणे सुलभ होण्यासह प्रती बिल पावतीमागे पाच रुपये उत्पन्न मिळविण्याची संधी वॉलेटधारकास मिळेल.

ठळक मुद्देमहावितरणचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वीजबिलाचा भरणा अधिक सुलभ व्हावा, यासाठी महावितरणने सातत्याने नवनवीन सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या आहेत. आता आणखी एक पाऊल पुढे टाकत महावितरणने स्वत:चे ‘पेमेंट वॉलेट’ आणले आहे. आवश्यक अटींची पूर्तता करणाऱ्या १८ वर्षांवरील कोणत्याही व्यक्तीला वॉलेटधारक होता येईल. यातून वीज ग्राहकांना विशेषत: ग्रामीण भागात वीज बिलाचा भरणा करणे सुलभ होण्यासह प्रती बिल पावतीमागे पाच रुपये उत्पन्न मिळविण्याची संधी वॉलेटधारकास मिळेल.वॉलेटधारक होण्यास इच्छुक असणाऱ्यांनी आधार कार्ड, पॅनकार्ड, जीएसटी क्रमांक, गुमास्ता प्रमाणपत्र, पत्त्याचा पुरावा, पासपोर्ट फोटो व रद्द केलेला धनादेश आदी आवश्यक कागदपत्रांच्या प्रती महावितरणच्या संकेतस्थळावरील लिंकवर अपलोड करून ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. अर्जदारांच्या अर्जाची व जागेची पडताळणी संबंधित उपविभागीय कार्यालयाकडून विनाशुल्क केली जाईल. तर मुंबईस्थित मुख्य कार्यालयाकडून अर्जांना मंजुरी मिळणार आहे. त्यासाठीचा सर्व पत्रव्यवहार नोंदणीकृत ई-मेल व मोबाईल क्रमांकावर केला जाईल. अर्जदाराला स्वत:हून महावितरणच्या कोणत्याही कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही. मुख्य कार्यालयाकडून अर्जाला मंजुरी मिळाल्यानंतर सुरुवातीला किमान पाच हजार रुपयांचे वॉलेट रिचार्ज व त्यानंतर एक हजार रुपयांच्या पटीत रिचार्ज करावे लागेल. डेबिट व क्रेडिट कार्ड तसेच ऑनलाईन बँकिंगच्या आधारे वॉलेट रिचार्ज करता येईल.वॉलेटधारक महावितरणच्या अ‍ॅपमध्ये नोंदणी करून महावितरणच्या ग्राहकांकडून वीज बिलाचा भरणा करून घेऊ शकतील. वॉलेटमध्ये बिलाचा भरणा झाल्यानंतर संबंधित ग्राहकाच्या नोंदणीकृत मोबाईलवर भरणा जमा झाल्याचा एसएमएस तत्काळ मिळणार असल्याने ग्राहकांचे जागेवर समाधान होऊ शकेल. एकाचा वॉलेटचा बॅलेन्स वापरून विविध लॉगीनद्वारे वेगवेगळ्या व्यक्तींकडून वीज बिलाचा भरणा करून घेण्याची सुविधा वॉलेटमध्ये देण्यात आली असून याचा लेखाजोखा व कमिशन महिनाअखेर मुख्य वॉलेटमध्ये जमा केले जाईल. कोणतीही सज्ञान व्यक्ती, दुकानदार, छोटे-मोठे व्यापारी, बचत गट, वीज मीटर रिडींग व बिलवाटप एजन्सी वॉलेटधारक होऊ शकतात. वॉलेटधारकास प्रती एका बिलामागे पाच रुपये कमिशन मिळणार असून महिना अखेरीस ते वॉलेटमध्ये जमा करण्यात येईल.

टॅग्स :electricityवीजbillबिलmahavitaranमहावितरण